S M L

सानिया भारतासाठीच खेळेल

4 एप्रिल लग्नानंतरही सानिया भारतासाठीच टेनिस खेळेल, अशी ग्वाही आज सानियाचा भावी पती आणि पाकिस्तानचा क्रिकेटर शोएब मलिक याने दिली. लग्नाच्या तयारीसाठी शोएब टेनिसपटू सानिया मिर्झाच्या हैदराबाद येथील घरी कुटुंबीयांसोबत दाखल झाला आहे. 15 एप्रिल रोजी होणार्‍या या लग्नासाठी दोन्हीही कुटुंबांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. या लग्नाची मीडियामध्ये मोठी चर्चा आहे. कारण शोएबची पहिली पत्नी आयेशा सिद्दिकी हिने या लग्नाला आक्षेप घेतला आहे. आयेशाच्या वकिलांनी याबाबत सानियाला कायदेशीर नोटीस पाठवून अब्रूनुकसानीचा दावा ठोकला आहे. दुसरीकडे शिवसेना, बजरंग दल, समाजवादी पार्टी आदींनी या विवाहास विरोध दर्शवला आहे.या पार्श्वभूमीवर शोएबने आज पत्रकारांसमोर आपली भूमिका मांडली. सानिया तिला हवे तेवढे क्रिकेट खेळेल. माझा आणि कुटुंबीयांचा तिला पाठींबा असेल. आणि पुढील काळातही ती भारताकडूनच क्रिकेट खेळेल, अशी ग्वाही त्याने यावेळी देऊन टाकली. अत्यंत बुजरेपणाने मीडियाला सामोरे गेलेल्या शोएबने आपले म्हणणे कागदावर लिहून आणले होते. अधिक तपशील आपले वकील सांगतील, असे तो वारंवार म्हणत होता. हे लग्न हैदराबादमध्येच होईल. आम्ही सध्या लग्नाच्या तयारीत बुडालेलो आहोत. मी आणि सानिया या लगीनघाईची मजा अनुभवत आहोत, असेही शोएब यावेळी म्हणाला.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 4, 2010 11:41 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 4, 2010 11:41 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close