S M L

रघुराम राजन देशभक्त, पंतप्रधान मोदींनी स्वामींना फटकारलं

Sachin Salve | Updated On: Jun 27, 2016 07:04 PM IST

रघुराम राजन देशभक्त, पंतप्रधान मोदींनी स्वामींना फटकारलं

दिल्ली - 27 जून : रघुराम राजन हे सच्चे देशभक्त आहे अशी प्रशंसा करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांना फटकारून काढलं. तसंच रघुराम राजन आणि मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम यांच्यावर होणारी टीका ही योग्य नाही असंही परखड मतही पंतप्रधानांनी व्यक्त केलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका खासगी इंग्रजी वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांचीही पहिलीच मुलाखत आहे. या मुलाखतीत नरेंद्र मोदी यांनी आपल्याच पक्षातील नेते सुब्रमण्यम स्वामी यांची चांगलीच कानउघडणी केली. रघुराम राजन हे काँग्रेसचे एजंट आहे असा गंभीर आरोप स्वामी यांनी केला होता. त्यावर मोदी यांनी अशी टीका करणे हे योग्य नाही. स्वामी यांची विधान अत्यंत चुकीचे होते. चर्चेत राहण्यासाठी त्यांनी अशी टीका केली असेल. पण त्यांच्या अशा वागणुकीमुळे कुणाचाही फायदा होणार नाही असं परखड मत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केलं. तसंच कुणी व्यवस्थेपेक्षा आपण मोठे असल्याचं दाखवत असेल तर ते अत्यंत चुकीचं आहे असं सांगत सुब्रमण्यम स्वामींची चांगलीच कानउघडणी केली.

रघुराम राजन यांच्या देशभक्तीवर कुणीच संशय घेऊ शकत नाही. राजन यांचं काम उत्तमच आहे. मी आशा करतो की, जर राजन निवृत्त झाले तरी त्यांचं देशासाठी कार्य सुरू असेल असंही पंतप्रधान मोदी म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 27, 2016 07:04 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close