S M L

मायनिंगचे परवाने रद्द करा

4 एप्रिलसिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व प्रकारचे मायनिंग परवाने ताबडतोब रद्द करावेत, अशी मागणी आज सावंतवाडीतील मायनिंग विरोधी परिषदेत करण्यात आली.मायनिंग प्रदूषण वाहतूक आणि बेकायदेशीर मायनिंगबद्दल लढा उभारण्यासाठी सावंतवाडीत आज मायनिंगविरोधी परिषद झाली. या परिषदेत चार ठराव मंजूर करण्यात आले. भूगर्भशास्त्रज्ञ, कायदेशीर सल्लागार, पर्यावरण तज्ज्ञ आणि मायनिंगविरोधी संघर्ष समितीचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पदाधिकारी या परिषदेत सहभागी झाले होते. परिषदेतील ठराव पुढीलप्रमाणे- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व प्रकारचे मायनिंग परवाने ताबडतोब रद्द करावेत केंद्र सरकारने नेमलेला पश्चिम घाट सर्वेक्षण अहवाल मिळेपर्यंत मायनिंगबाबतची कोणतीही जनसुनावणी घेण्यात येऊ नयेबेळगाव- सावंतवाडी घोषित रेल्वे मार्ग कर्नाटकातील मायनिंग लॉबीच्या हिताचा आहे. त्यामुळे त्याला मूर्त स्वरूप देण्यात येऊ नये.सध्या ज्या जिल्ह्यांत मायनिंग सुरू आहे, तिथे अनिर्बंध खनिज वाहकतुकीसाठी पायबंद घालावा. वाहतुकीला वेळेची मर्यादा घालावी. दरम्यान मायनिंग विरोधाच्या निमित्ताने मला विरोध करणार्‍यांना मी जुमानत नाही, असे महसूलमंत्री नारायण राणे यांनी म्हटले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 4, 2010 12:23 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 4, 2010 12:23 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close