S M L

नौदल अधिकार्‍यांचा घोटाळा उघड

5 एप्रिलराजकीय नेते, सरकारी अधिकार्‍यांनी केलेले अनेक घोटाळे आपल्याला पाहायला मिळतात. पण ज्यांच्यावर सामान्य माणसांचा प्रचंड भरवसा असतो, अशा सैन्यांच्या अधिकार्‍यांनीच केलेला घोटाळा आता समोर आला आहे. मुंबईतील नेव्ही नगरमध्ये उभारलेल्या 27 मजली हाऊसिंग सोसायटीच्या बिल्डिंगवरून हा वाद निर्माण झाला आहे. तिथे पूर्वी शिवसेनेच्या मालकीचे कुकरी पार्क होते. मात्र 2003 मध्ये सरकारी आदेशानुसार ते हाऊसिंग सोसायटी उभारण्यासाठी दिले. पण शिवसेनेने आपला मालकी हक्क सोडल्याचे कुठेही नमूद केलेले नाही. खरे तर या जमिनीवर आदर्श सोसायटी बनवणारे नेव्हीचे काही अधिकारीच असल्याचे पुढे येत आहे. त्यावेळी मेजर जनरल तेज किशन कौल यांनी यासाठी ना हरकत प्रमाणपत्र दिले होते. सुरूवातीला 4 मजली बिल्डिंगना परवानगी देण्यात आली होती. नंतर ती 14 मजली झाली आणि 2008मध्ये 27 मजली बिल्डिंगला परवानगी देण्यात आली. या जागेच्या भ्रष्टाचाराला नुकतेच निवृत्त झालेले लष्करप्रमुख दीपक कपूर यांच्यासह अनेक लष्करी अधिकार्‍यांचा वरदहस्त असल्याचे बोलले जात आहे.मात्र खुद्द नगर विकास राज्य मंत्र्यांच्या मते एवढी उंच बिल्डिंग नेव्हीच्या एरियात असणेच बेकायदेशीर आहे. एमएसआरडीने कोणत्या तत्वांवर या बिल्डिंगला परवानगी दिली, कोणते कायदेशीर मुद्दे लक्षात घेतले, असे अनेक प्रश्न आता निर्माण होत आहेत. त्यामुळे आता महाराष्ट्र सरकारलाही याची उत्तरे द्यावी लागतील.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 5, 2010 09:52 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 5, 2010 09:52 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close