S M L

केंद्रीय मंत्रिमंडळाचा आज विस्तार, भामरेंना संधी तर आठवलेंची स्वप्नपूर्ती

Sachin Salve | Updated On: Jul 5, 2016 09:10 AM IST

केंद्रीय मंत्रिमंडळाचा आज विस्तार, भामरेंना संधी तर आठवलेंची स्वप्नपूर्ती

 

दिल्ली - 05 जुलै : केंद्रीय मंत्रिमंडळाचा आज विस्तार होतोय. राज्यातून 2 नावांवर शिक्कामोर्तब झालं आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले आणि धुळ्याचे खासदार सुभाष भामरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे. या मंत्रिमंडळात दहा राज्यातून 19 नव्या चेहर्‍यांना संधी मिळणार आहे. आज सकाळी 11 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे.

रामदास आठवले यांचं मंत्रिपदाचं स्वप्न पूर्ण झालं आहे. काल आठवले यांनी सकाळी अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं. आठवले महाराष्ट्रातील प्रमुख दलित नेत्यांपैकी एक आहेत. उत्तर प्रदेशच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. दुसरीकडे जळगावातील पॉवरफुल नेते एकनाथ खडसे यांची राज्य मंत्रिमंडळातून गच्छंती झाल्यानंतर धुळ्याच्या डॉ. सुभाष भामरे यांना भाजपनं केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान दिलं आहे. मराठा समाजाचे डॉ. भामरे यांची प्रतिमा स्वच्छ राजकारणी अशी आहे. उत्तर महाराष्ट्रातील बिघडलेलं समीकरण दुरुस्त करण्यासाठीचा हा प्रयत्न असल्याची चर्चा सुरू आहे.

कोण आहेत डॉ. सुभाष भामरे ?

- 2014 च्या लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच धुळे मतदारसंघातून विजयी

- कॅन्सरग्रस्त आणि इतर रुग्णांना घरी जाऊन थेट सेवा देण्याचं काम

- लोकाग्रहास्तव राजकारणात प्रवेश

- पहिल्याच निवडणुकीत काँग्रेसच्या अमरीश पटेल यासारख्या दिग्गज उमेदवाराला हरवून लोकसभेत प्रवेश

- अभ्यासू खासदार अशी ओळख

- संसदेच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण समितीचे सदस्य

- अनेक देशांना भेटी देऊन आरोग्यविषयक सुविधांचा अभ्यास

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 5, 2016 09:10 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close