S M L

'बॉम्बे हायकोर्ट' आता होणार 'मुंबई हायकोर्ट'

Samruddha Bhambure | Updated On: Jul 5, 2016 07:14 PM IST

'बॉम्बे हायकोर्ट' आता होणार 'मुंबई हायकोर्ट'

05 जुलै : शहरांचे नामांतर होऊनही पूर्वीचीच नावं कायम राहिलेल्या 'बॉम्बे', 'मद्रास' आणि 'कलकत्ता' या ऐतिहासिक हायकोर्टांचे नामांतरणाचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आज (मंगळवारी) झालेल्या बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार बॉम्बे हायकोर्टाचे नाव आता मुंबई हायकोर्ट होणार आहे, तर मद्रास हायकोर्ट आता चेन्नई हायकोर्ट म्हणून ओळखलं जाणार आहे. यासोबतच पूर्वीचे कलकत्ता हायकोर्ट यापुढे कोलकाता हायकोर्ट म्हणून ओळखले जाईल.

केंद्रीय दूरसंचार मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी याबद्दलची माहिती मंगळवारी दिली. 1990 नंतर मुंबई आणि चेन्नई या 2 महानगरांचं नामांतर झाल्यानंतर तिथल्या हायकोर्टाचंही नामांतर करण्याची मागणी जवळपास सर्वच राजकीय पक्षांनी केली होती. 'इंडियन हायकोर्ट ऍक्टटनुसार 1860 साली स्थापन झालेल्या या हायकोर्टांच्या नामांतरासाठी विधेयक आणण्याचा विधि मंत्रालयातील न्याय विभागाचा प्रस्ताव होता. त्याला मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 5, 2016 07:14 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close