S M L

केंद्रीय मंत्रिमंडळात मोठे फेरबदल; इराणींचे खाते काढले

Samruddha Bhambure | Updated On: Jul 5, 2016 11:25 PM IST

केंद्रीय मंत्रिमंडळात मोठे फेरबदल; इराणींचे खाते काढले

05 जुलै  : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मंत्रिमंडळात 19 नव्या मंत्र्यांचा समावेश केल्यानंतर मंत्रिमंडळात मोठे फेरबदल केले आहेत. त्यानुसार स्मृती इराणी यांच्याकडील मनुष्यबळ विकास मंत्रालय काढून ते बढती देण्यात आलेल्या प्रकाश जावडेकर यांच्याकडे सोपण्यात आलं आहे. तर स्मृती इराणी यांच्याकडे वस्त्रोद्योग मंत्रालयाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे.

रामदास आठवले यांच्याकडे सामाजिक न्याय राज्यमंत्रीपद देण्यात आलं असून, डॉ. सुभाष भामरे यांच्याकडे संरक्षण राज्यमंत्रीपदाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे. याबरोबरच जयंत सिन्हा यांच्याकडील वित्त मंत्रालय काढून त्यांना नागरी विमान वाहतूक मंत्रालयात धाडण्यात आलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळात फेरबदल केल्यानंतर कोणाला कोणते खातं मिळाले याची यादी:

प्रकाश जावडेकर : मनुष्यबळ विकास मंत्रालय

स्मृती इराणी : वस्त्रोद्योग मंत्री

नरेंद्र सिंह तोमर : ग्रामविकास मंत्रालय

व्यंकय्या नायडू : माहिती आणि प्रसारण मंत्रालय

रविशंकर प्रसाद : कायदा, माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालय

एम जे अकबर : परराष्ट्र व्यवहार मंत्रालय

अनंत कुमार : संसदीय कामकाज मंत्रालय

मनोज सिन्हा : टेलिकॉम मंत्रालय

सदानंद गौडा : सांख्यिकी मंत्रालय

रामदास आठवले : सामाजिक न्याय मंत्रालय ( राज्यमंत्री)

चौधरी विरेंद्र सिंह : ग्रामविकास मंत्रालय ( राज्यमंत्री)

अनिल महादेव दवे : वित्त मंत्रालय( राज्यमंत्री)

विजय गोयल : युवक कल्याण आणि क्रीडा (राज्यमंत्री) (स्वतंत्र कार्यभार)

डॉ. सुभाष भामरे : संरक्षण मंत्रालय ( राज्यमंत्री)

बाबुल सुप्रियो : नगरविकास मंत्रालय ( राज्यमंत्री)

अनुप्रिया पटेल : आरोग्य आणि कुटुंब कल्याण (राज्यमंत्री)

- जयंत सिन्हा : नागरी हवाई वाहतूक (राज्यमंत्री)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 5, 2016 11:24 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close