S M L

हिजबुल मुजाहिद्दीनचा टॉप कमांडर बुरहान वानी चकमकीत ठार

Samruddha Bhambure | Updated On: Jul 8, 2016 10:52 PM IST

हिजबुल मुजाहिद्दीनचा टॉप कमांडर बुरहान वानी चकमकीत ठार

08 जुलै :  हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचा मोस्ट वॉन्टेड टॉप कमांडर आणि काश्मीर खोऱ्यातील दहशतवादाचा चेहरा अशी ओळख असलेला बुरहान वानी पोलीस चकमकीत ठार झाला आहे. जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये मोठी चकमक सुरू आहे. यात बुरहान मारला गेला. जम्मू-काश्मीर पोलीस दलाचे प्रमुख के. राजेंद्र यांनी बुरहान मारला गेल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

बुरहान वानी हा २०१०मध्ये वयाच्या १५ व्या वर्षी हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेत सामिल झाला होता. काश्मीर खोऱ्यात जर का पंडित आणि सैन्यासाठी वसाहती निर्माण केल्या गेल्या, तर त्यांवर हल्ले करण्यात येतील अशी धमकी बुरहान याने एका व्हिडिओद्वारे दिली होती. विशेषत: जम्मू-काश्मीरच्या पोलिसांवर अधिक हल्ले करण्यात येतील असा या व्हिडिओतील धमकीचा रोख होता. भारत सरकारने बुरहान वानीला पकडणाऱ्याला १० लाख रुपयांचे इनाम देखील जाहीर केलं होतं. अनंतनागमध्ये पोलीस आणि दहशतवाद्यांदरम्यान सुरू असलेली चकमक अद्याप सुरूच आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 8, 2016 10:52 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close