S M L

महाराष्ट्राची भाग्यरेखा कोयना

चंद्रकांत पाटीलमहाराष्ट्राची भाग्यरेखा म्हटलेकी कोयना प्रकल्पाचे नाव आपोआप पुढे येते. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून या प्रकल्पाने पाण्यावर वीज निर्मिती करण्याचे अनेक उच्चांक गाठले आहेत. सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या या धरणामुळे 40 हजार हेक्टर जमीन लिताखाली आली. कोयना म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानाचा एक अद्भूत चमत्कार. आणि जगातील महत्वाच्या प्रकल्पांपैकी एक. 1910 मध्ये टाटा वीज कंपनीने कोयनेच्या सर्व्हेक्षणाचे काम सुरू केले. दुसर्‍या महायुद्धाची झळ बसल्यामुळे ते काहीसे मागे पडले. पुढे यशवंतराव चव्हाण, बाळासाहेब देसाई, धनंजयराव गाडगीळ, मालोजीराजे नाईक-निंबाळकर आणि शंतनुराव किर्लोस्कर अशा द्रष्ट्या नेत्यांच्या अविरत प्रयत्नातून 1957 मध्ये या प्रकल्पाची पायाभरणी झाली. तब्बल दहा वर्षांनी म्हणजे 1967 मध्ये हा महत्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण झाला. पंडीत जवाहरलाल नेहरू असो किंवा इंदिरा गांधी दोघांनी या प्रकल्पाच्या उभारणीमध्ये आवर्जून लक्ष घातले.पश्चिम घाटातील भौगोलिक रचना, उच्चांकी पाऊस याचं नैसर्गिक वरदान कोयनेला मिळाले. महाबळेश्वरमधील कोयना नदीवरील हे धरणा 65 किलोमीटर एवढ्या विस्तीर्ण परिसरात पसरले आहे. या पट्‌ट्यात अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती निर्माण होते. त्याचा फटका आसपासच्या गावांना बसतो. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी मूळ धरणाच्या उंचीत पाच फूटाने वाढ करण्यात आली आहे. देशातील इतर धरणांशी तुलना करताना कोयनेचे वेगळेपण अधोरेखीत होते.कोयनेचं पाणलोट क्षेत्र आहे 891.78 चौरस किलोमीटर. त्याची पाणी साठवण्याची क्षमता 105.250 टीएमसी इतकी आहे. धरणाची उंची 103 मीटर इतकी असून लांबी 807.72 मीटर आहे. मुळात हायड्रो इलेक्ट्रीक पॉवर प्रोजक्ट म्हणून कोयना धरणाची उभारणी केली गेली. 2 हजार मेगावॅट वीजनिर्मिती आणि 40 हजार हेक्टर जमीन ओलिताखाली आल्याने या प्रकल्पाचा दुहेरी फायदा झाला. कोयनेत भूयारात चार टप्प्यात 1960 मेगावॅट वीजनिर्मिती सुरू आहे. पहिल्या आणि दुसर्‍या टप्प्यात 600 मेगावॅट वीजेची निर्मिती होते. तर तिसर्‍या टप्प्यात 320 मेगावॅट, चौथ्या टप्पात एक हजार मेगावॅट आणि धरण पायथ्याजवळ 40 मेगावॅट वीजेची निर्मिती केली जात आहे.आशिया खंडात लेक टॅपिंगचा प्रयोग करणारे कोयना हे एकमेव धरण आहे. धरण जलाशयातील पाणीसाठा कमी झाल्यावरही किनार्‍यापासून लांब असलेल्या जलाशयाच्या पाण्याचा उपयोग करणारा हा प्रकल्प. त्याचा चौथा टप्पा 1999 मध्ये कार्यान्वित करण्यात आला. या टप्प्याचे आता नव्याने विस्तारीकरण होत अआहे. तो 4-बी या नावाने ओळखला जातो. सध्या त्याचे 80 टक्के काम पूर्ण झाले असून फेब्रुवारी 2011 मध्ये ते पूर्ण होणार आहे. त्यामुळे 15 टीएमसी पाणी अतिरिक्त वीजनिर्मितीसाठी वापरता येणार आहे. राज्याच्या एकूण वीज निर्मितीपैकी दोन तृतीयांश वीज कोयना प्रकल्प पुरवतो. मात्र या परिसराला वारंवार भूकंपाचे धक्के बसतात. या धक्क्यांमुळे धरणाची हानी होऊ नये, यासाठी 100 कोटी रुपये खर्च करून धरणाची भिंत मजबूत करण्यात आली आहे.कोयना प्रकल्पामुळे महाराष्ट्रात कृषी आणि औद्योगिक क्षेत्राचा खर्‍या अर्थाने विकास झाला. त्यामुळेच आज हे धरण महाराष्ट्राची भाग्यरेखा ठरले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 6, 2010 03:53 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 6, 2010 03:53 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close