S M L

मोदींना लोकशाही शिकवल्याबद्दल कोर्टाचे आभार -राहुल गांधी

Sachin Salve | Updated On: Jul 13, 2016 05:36 PM IST

दिल्ली, 13 जुलै : उत्तराखंडपाठोपाठ अरुणाचलप्रदेशमधून राष्ट्रपती राजवट हटवण्याचे सुप्रीम कोर्टाने आदेश देऊन मोदी सरकारला चांगलाच धक्का दिलाय. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत करत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदींना खडेबोल सुनावले. लोकशाही म्हणजे काय असते हे शिकवल्याबद्दल सुप्रीम कोर्टाचे आभारच राहुल गांधींनी मानले.rahul vs modi _bihar

अरुणाचल प्रदेश हा गेल्या कित्येक वर्षांपासून भाजपसाठी हा जिव्हाळ्याचा विषय बनला होता. त्यामुळे अरुणाचलमध्ये बंडखोरांनी भाजपच्या पाठिंब्यावर सत्ता काबिज केली. बंडखोरांचे नेते कालिखो पुल यांनी भाजपच्या 11 आमदारांच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्रिपदाची शपथही घेतली होती. पण, सत्तेची चव फार काळ चाखत आला नाही. सुप्रीम कोर्टाने आज राष्ट्रपती राजवट हटवत भाजपच्या हातातून सत्ता हिसाकावून घेत पुन्हा काँग्रेसच्या ताब्यात दिली. उत्तराखंडपाठोपाठ केंद्र सरकारला हा दुसरा मोठा धक्का मानला जात आहे. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाचं स्वागत करत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींवर सडकून टीका केलीये. पंतप्रधानांना लोकशाही म्हणजे काय हे शिकवल्याबद्दल राहुल गांधी यांनी सुप्रीम कोर्टाचे आभार मानले आहे.

आता तरी मोदी धडा घेतील - केजरीवाल

उत्तराखंडनंतर मोदी सरकारला सुप्रीम कोर्टाने आज पुन्हा एकदा चपराक लगावली आहेे. निदान आतातरी पंतप्रधान मोदी यातून धडा घेतील. केंद्र सरकारने इतर राज्यांना नाहक त्रास देऊ नये असा सल्लावजा टोला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी लगावला.

हा केंद्राला मिळालेला धडा -सीताराम येंचुरी

तर, अरुणाचलबद्दलचा निकाल हा केंद्राला मिळालेला धडा आहे. राज्यपालांमार्फत आपल्या संघराज्याशी खेळू पाहणार्‍यांना हा इशारा आहे. सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठाच्या या निर्णयामुळे राजकीय नीतीमत्ता आणि दायित्व यांच्याविषयी महत्त्वाचे प्रश्न उपस्थित झाले आहेत. केंद्र सरकारमधील कोणी याची जबाबदारी घेणार आहे का? असा सवाल सीपीएमचे सरचिटणीस सीताराम येंचुरी यांनी उपस्थित केलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 13, 2016 02:28 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close