S M L

भाजपची खासदारकी नकोशी झाली होती-सिद्धू

Sachin Salve | Updated On: Jul 19, 2016 03:00 PM IST

भाजपची खासदारकी नकोशी झाली होती-सिद्धू

दिल्ली, 19 जुलै : नवज्योत सिंग सिद्धू यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर ते कोणत्या पक्षात जाणार याची चर्चा सुरू झाली. त्यातच सिद्धु यांनी पत्रक काढून भाजप आपल्यासाठी आता ओझं झाल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे ज्या भाजपने सिद्धू यांना राज्यसभेवर पाठवलं तो पक्ष सिद्धूंना अचानक ओझं कसं वाटायला लागला अशीही चर्चा सुरू झालीय.

नवज्योत सिंग सिद्धू यांनी काल आपल्या खासदारकीचा राजीनामा दिलाय. पंजाबमध्ये आगामी निवडणुकीच्या तोंडावर सिद्धू यांचा राजीनामा भाजपला धक्का मानला जात आहे. सिद्धू आपमध्ये सामिल होण्याची शक्यता आहे. आज सिद्धूंनी आपल्या नाराजीला निवेदनातून वाट मोकळी करून दिली. भाजपकडून मिळालेली राज्यसभेची खासदारकी आपल्या ओझं झालं होतं त्यामुळे आपण राजीनामा दिला असा खुलासा सिद्धूंनी केला. तर दुसरीकडे सिद्धू यांनी भाजप सोडलं असलं तरी त्यांची पत्नी नवज्योत कौर सिद्धू या मात्र अजूनही भाजपमध्ये आहेत. आता सिद्धू भाजपमध्ये पुन्हा ऐण्याची शक्यता नाही. आणि आपला भाजप सोडायचा कोणताही विचार नसल्याचं सिद्धू यांच्या पत्नी नवज्योत कौर सिद्धू यांनी स्पष्ट केलं.

नवज्योत सिंग सिद्धूचं निवेदन

"आदरणीय पंतप्रधानांच्या सांगण्यावरून पंजाबच्या हितासाठी, मी राज्यसभेतील नियुक्ती स्वीकारली होती. मात्र, पंजाबच्या विकासाच्या संधी एकेक करून बंद होताना दिसत असताना, या नियुक्तीला काहीच अर्थ उरला नाही असं दिसतंय. आता माझ्यासाठी हे फक्त ओझं झालंय, ते पुढे वाहण्यात मला काहीच अर्थ दिसत नाही. जेव्हा चूक आणि बरोबर यांची लढाई असते, तेव्हा तटस्थ राहता येत नाही. स्वत:चा विचार करण्यापेक्षा पंजाबचं हित लक्षात घेणं मला अधिक योग्य वाटतं."

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 19, 2016 03:00 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close