S M L

मायावतींवर असभ्य टीका करणार्‍या भाजप नेत्याची हकालपट्टी

Sachin Salve | Updated On: Jul 20, 2016 05:55 PM IST

मायावतींवर असभ्य टीका करणार्‍या भाजप नेत्याची हकालपट्टी

20 जुलै : बसपाच्या नेत्या मायावती यांच्या असभ्य भाषेत टीका करणारे उत्तरप्रदेशचे भाजपचे उपाध्यक्ष दया शंकर सिंह यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आलीये. यूपीेचे भाजपचे अध्यक्ष केशव प्रसाद मौर्या यांनी याबद्दल घोषणा केलीये. दया शंकर सिंह यांनी याबद्दल जाहीर माफी मागितलीये.

मायावती पैसे घेऊन पक्षाची तिकिटं देतात, त्यांचं चारित्र्य हे एका XXपेक्षाही खाली गेलंय, अशी असभ्य टीका दया शंकर सिंह यांनी केली होती. त्याचा या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. त्यांच्या टीकेमुळे संसदेत गदारोळ झाला. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज मायवतींची माफी मागितली, आणि या दया शंकरला भाजपनं चांगलंच फैलावर घेतलंय. मायावतींनी काही वेळापूर्वी राज्यसभेत भावनिक भाषण केलं. मी कधी कुणावर अशी टीका नाही केली, पण भाजप दलितांविषयी जी भावना ठेवतं त्याला देश माफ करणार नाही असं मायावती राज्यसभेत म्हणाल्या. यूपीेचे भाजपचे अध्यक्ष केशव प्रसाद मौर्या यांनी पत्रकार परिषद घेऊन पक्षात अशा वक्तव्य करणार्‍यांना थारा नाही असं स्पष्ट करत दया शंकर सिंहची हकालपट्टी करण्यात आलीये.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 20, 2016 05:55 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close