S M L

थेंबभर पाण्याची किमया

प्रशांत बाग, जळगाव7 एप्रिल महत्वाकांक्षा, दूरदृष्टी आणि जिद्द असेल तर कोणीही शून्यातून विश्व निर्माण करू शकतो. आणि याचे उत्तम उदाहरण म्हणजे जळगावची जैन इरिगेशन ही कंपनी. आज 140 देशांत या कंपनीची उत्पादने विकली जात आहेत मायक्रो इरिगेशनमध्ये जगात प्रथम क्रमांकाचा व्यवसाय करणारी ही कंपनी मोठ्या जिद्दीतून उभी राहिली आहे. भारत हा शेतीप्रधान देश आहे त्यामुळे शेती व्यवसाय हा नफ्यात असला पाहिजे हा ध्यास भवरलाल जैन यांनी घेतला. आणि त्यातूनच उभे राहिले जैन इरिगेशन.भारतीय प्रशासन सेवेतील नोकरीकडे पाठ फिरवून भवरलाल जैन यांनी पाईपची निर्मिती सुरू केली. या प्लास्टिक पाईपमुळे वीज, पाणी या दोघांचीही बचत होत असल्याचे शेतकर्‍यांच्या लक्षात आले. आणि शेतकर्‍यांचा जैन इरिगेशनवर जो विश्वास बसला तो आजही कायम आहे.केळी हे खान्देशातील प्रमुख पीक. पण भवरलाल यांनी कांद्यावर केलेल्या नवीन प्रयोगातून जे व्ही 12 ही जात विकसित केली. आणि केळी सोडून शेतकर्‍यांनी कांद्याची लागवड करावी म्हणून शेतकर्‍यांना किमान हमी भाव दिला. प्रयोग यशस्वी झाला. आणि केळी पिकवणारा खान्देशातील शेतकरी चक्क कांद्याची लागवड करू लागला. तंत्रज्ञानाचा अधिकाधिक उपयोग जैन इरिगेशनने केळी लागवडीसाठी केला. ठिबक प्रणालीचा उपयोग केल्याने केळीच्या पिकाने विक्रमी उत्पादन द्यायला सुरुवात केली. आता याच तंत्रज्ञानाचा उपयोग जगातील अनेक देशांत सुरू झालाआहे. जैन इरिगेशनने विकसित केलेल्या कंपोझिट पाईप्स आणि मायक्रो इरिगेशन तंत्रज्ञानावर आज वेगवेगळे 250 लघु उद्योग व्यवसाय सुरू आहेत. विविध क्षेत्रातील गुणवंतांचा आधार म्हणूनही जैन इरिगेशनची ओळख आहे. आपल्या नफ्यातील महत्वाचा वाटा ते सामाजिक बांधिलकी म्हणून खर्च करतात.सौर उर्जेच्या क्षेत्रातही त्यांचे प्रयोग यशस्वी होताना दिसत आहेत.देशातील शेती उद्योगात जैन इरिगेशनचे स्थान निर्विवादपणेअत्यंत महत्वाचे आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 7, 2010 03:05 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 7, 2010 03:05 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close