S M L

'आदर्श' पाडू नका, केंद्राच्या ताब्यात द्या, सुप्रीम कोर्टाचे आदेश

Sachin Salve | Updated On: Jul 22, 2016 02:42 PM IST

'आदर्श' पाडू नका, केंद्राच्या ताब्यात द्या, सुप्रीम कोर्टाचे आदेश

दिल्ली, 22 जुलै : मुंबईतील वादग्रस्त आदर्श सोसायटी इमारत केंद्र सरकारने ताब्यात घ्यावी असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.

सुप्रीम कोर्टाने मुंबई हायकोर्टाचा निर्णयाला स्थगिती देत इमारत केंद्राच्या ताब्यात देण्याचे आदेश दिले आहे.

राज्याच्या राजकारणात भूकंप घडवणार्‍या आणि एका मुख्यमंत्र्यांना पदावरून पायउतार होण्यास भाग पाडणार्‍या वादग्रस्त आदर्श सोसायटीची इमारत पाडण्याचे आदेश हायकोर्टाने केंद्र सरकारला दिले होते. युद्धात शहीद झालेल्या जवानांच्या वीरपत्नींसाठी आदर्श सोसायटी नेते आणि अधिकार्‍यांच्या संगमताने उभी राहिली.

पण, या इमारतीत वीरपत्नींच्या नावे फ्लॅट लाटल्याचा आदर्श घोटाळा समोर आल्यामुळे काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्रिपदावरुन पायउतार व्हावं लागलं होतं. या प्रकरणी प्रवीण वाटेगावकर यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केलीय. या याचिकेवर सुनावणीदरम्यान मुंबई हायकोर्टाने आदर्श सोसायटीची 31 मजली इमारत पाडण्याचे आदेश दिले होते.

आदर्श सोसायटीकडे सीआर झेड परवानगी नव्हती त्यामुळे हायकोर्टाने हे आदेश दिले होते. या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आवाहन देण्यात आलं. सुप्रीम कोर्टाने मुंबई हायकोर्टाच्या निर्णयला स्थगिती देत इमारत केंद्राच्या ताब्यात घेण्याचे आदेश दिले आहे. सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा रहिवाशांना धक्का मानला जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 22, 2016 02:42 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close