S M L

भारतीय वायू सेनेचं 29 प्रवाशी असलेलं विमान बेपत्ता, शोधमोहीम सुरू

Sachin Salve | Updated On: Jul 22, 2016 03:04 PM IST

भारतीय वायू सेनेचं 29 प्रवाशी असलेलं विमान बेपत्ता, शोधमोहीम सुरू

नवी दिल्ली, 22 जुलै : भारतीय वायू सेनेचं एन-32 विमान बेपत्ता झालंय. एन-32 विमान चेन्नई ते पोर्ट ब्लेयरच्या मार्गातून अचान क गायब झालं. या विमानात 29 जण असल्याची माहिती मिळतेयं.

एन-32 विमान सकाळी 9 वाजता तांबरम हवाई तळावरून विमानानं पोर्ट ब्लेअरकडे उड्डाण केलं होतं. हवाई दलासाठी नियमित हे उड्डाण होतं. पण त्यानंतर काही तासांनंतर त्याचा संपर्क तुटला. या विमानात 29 जण होते. बंगाल उपसागरावर असताना विमान बेपत्ता झालंय. नौदल, वायू सेना आणि कोस्टगार्ड या बेपत्ता विमानाच्या शोधात मोहिम हाती घेतलीये. रशियामध्ये या विमानाची निर्मिती करण्यात आली होती. छोट्या धावपट्टीवरून उड्डाण करण्याची क्षमता या विमानात होती. भारतीय हवाई दलाकडे असे 100 एन-32 विमानं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 22, 2016 03:04 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close