S M L

सलमान खाननेच काळवीटाची शिकार केली, जोधपूरमध्ये ड्रायव्हर साक्षीवर ठाम

Samruddha Bhambure | Updated On: Jul 28, 2016 04:03 PM IST

सलमान खाननेच काळवीटाची शिकार केली, जोधपूरमध्ये ड्रायव्हर साक्षीवर ठाम

28 जुलै :  राजस्थानमधील काळवीट शिकार प्रकरणातील मुख्य साक्षीदार जो गेले काही दिवस गायब होता तो पुन्हा समोर आला आहे. काळवीट शिकार झाली त्यावेळी म्हणजे 1998 मध्ये सलमान खानचा ड्रायव्हर असलेले हरिश दुलानी यांनी पुन्हा एकदा समोर येऊन सलमाननेच काळवीट शिकार केली असल्याचं सांगितलं आहे. राजस्थान हायकोर्टने सलमान खानची निर्दोष मुक्तता करण्यावर हरिश दुलानी यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

1998 मध्ये जेव्हा हे शिकार प्रकरण उजेडात आलं त्यावेळी हरीशची साक्ष महत्त्वाची ठरली होती. पण हरीश नंतर गायब झाल्याचं सांगण्यात आलं. शिवाय त्याची उलटतपासणीही घेण्यात आली नव्हती. 'मात्र, मी गायब नव्हतो तर सरकारी साक्षीदार झाल्याने मला धमक्या येत होत्या. मला जाणुनबुजून लांब राहावे लागत होते', असा दावा हरिश दुलानी यांनी केला आहे.

'काळवीट शिकार प्रकरणानंतर ऑक्टोबर 1998 मध्ये दंडाधिकार्‍यांसमोर दिलेल्या साक्षीवर मी ठाम असल्याचंही हरिश दुलानी यांनी सांगितलं आहे. जर मला कोर्टाने संरक्षण दिलं तर सलमान खाननेच काळवीटाची शिकार केली आहे हे मी पुन्हा सांगेन', असं हरिश दुलानी यांनी म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 28, 2016 09:55 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close