S M L

भारत - ऑस्ट्रेलिया क्रीकेट सामने - संयमाची परीक्षाही होणार

14 ऑक्टोबर, नवी दिल्लीभारत - ऑस्ट्रेलिया दरम्यानच्या सिरीज गेली काही वर्षं मैदानावरच्या क्रिकेट बरोबरच खेळाडूंमधल्या वादांमुळे गाजल्या आहेत.वादग्रस्त पार्श्वभूमीमुळे या सिरिजवर टीकाकारांचं लक्ष आहेच...आणि बंगलोर टेस्टमध्येही काही वेळा याची शाब्दीक चकमकी उडाल्याच. अर्थात, सिडनी टेस्ट इतकी परिस्थिती हाताबाहेर नाही गेली. पण दोन्ही टीम्समधलं मैदानावरचं नातं यामुळे पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे.हिल्या इनिंगमध्ये पाच विकेट्स आणि तळाच्या बॅट्समनना हाताशी धरुन भारतीय इनिंगला आकार देताना केलेली मोलाची हाफ सेंच्युरी या दुहेरी कामगिरीच्या जोरावर झहीर खानला बंगलोर टेस्टमध्ये 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार मिळाला.पण झहीर एवढ्यावरच थांबला नाही. ऑस्ट्रेलियन खेळाडूंना झहीरने बॅट आणि बॉल बरोबरच आपल्या तोंडानेही उत्तर दिलं आहे.हॅडिन बरोबर भर मैदानात त्याची शाब्दिक चकमक उडाली.ऑस्ट्रेलियन टीम आता पूर्वी सारखी राहिलेली नाही असंही त्याने सुनावलं.बंगलोर टेस्ट तशी शांततेतच पार पडली. पण बॅट्समन आणि फास्ट बोलर्स यांच्यात तुरळक चकमकी झाल्याच.गेल्यावर्षीची सिडनी टेस्ट दोनही देशातले क्रिकेट फॅन्स विसरणं शक्य नाही..खरं तर या टेस्टपासूनच या दोन्ही टीममधल्या खेळाडूंदरम्यान तणाव वाढला. या सिरिजमध्ये अजून तीन टेस्ट बाकी आहेत. आणि सिरीजमध्ये एखादा अप्रिय प्रसंग घडू नये अशीच प्रार्थना सगळे करतायत.थोडक्यात या सिरिजमध्ये खेळाडूंचं कसब तर पणाला लागणारच आहे..शिवाय खेळाडूंच्या संयमाची परीक्षाही इथे होणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 14, 2008 04:14 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 14, 2008 04:14 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close