S M L

आता पासपोर्ट मिळणार फक्त तीन दिवसांत

15 ऑक्टोबर, नवी दिल्ली - पूर्वी पासपोर्ट मिळण्यासाठी चिक्कार द्रविडी प्राणायाम करावा लागायचा. पण आता फक्त तीन दिवसांत हातांत पासपोर्ट मिळणार आहे.देशातली सगळयात मोठी सॉफ्टवेअर कंपनी टीसीएसने या नव्या पासपोर्ट प्रोजेक्टवर काम सुरू केलं आहे.पुढच्या वर्षीपर्यंत ही सुविधा प्रत्यक्ष कार्यान्वित होईल. नव्या पद्धतीने पासपोर्ट तयार करण्यासाठी टीसीएसला सरकारकडून एक हजार कोटी रुपयांचं कॉन्ट्रॅक्ट मिळालं आहे. मार्च 2009 पासून याचे पायलट प्रोजेक्ट चंदीगढ आणि बंगळुरु मध्ये सुरू होतील.जानेवारी 2010 पर्यंत देशात 77 नवी पासपोर्ट केंद्र असतील आणि जुन्या 37 पासपोर्ट केंद्रांमध्येही आधुनिक सुविधा दिल्या जातील.या नव्या पासपोर्ट प्रोजेक्टसाठी एक सेंट्रलाईज्ड सिस्टम असेल, जी पासपोर्ट सेवा केंद्र, पासपोर्ट कार्यालय आणि जिल्हा पोलिस मुख्यालयांशी जोडलेली असेल. या नव्या पासपोर्ट पद्धतीत नागरिकांना थोडे जास्त पैसे मोजावे लागतील. कारण या सर्व सुविधा देणारे सर्व्हिस प्रोव्हायडर त्यांचा सर्व्हिस चार्ज यात लावतील. टीसीएस एका पासपोर्टमागे एकशे नव्याण्णव रुपये लावणार आहे; आणि हे पैसे सरकार त्यांना देईल. दर तीन महिन्यांनी सर्व्हिस प्रोव्हायडर्सना त्यांचे पैसे मिळतील पण अर्थातच वाढीव फी लावल्यानंतर सर्व्हिस प्रोव्हायडर्सना मिळणारे हे पैसे नागरिकांच्याच खिशातून जाणार आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 15, 2008 05:28 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 15, 2008 05:28 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close