S M L

लालबाग परळला उत्साही प्रतिसाद

विनोद घाटगे, मुंबई9 एप्रिलगिरणी कामगारांचा संप आणि त्यानंतर गिरणगावाची झालेली वाताहत यांचे चित्रण असलेला लालबाग परळ सिनेमा आज रिलीज झाला. या सिनेमाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. मुंबई...कुणाला ही जिवाची वाटते तर कुणाला पैशाची...बॉलिवूडचा झगमगाटही इथलाच आणि गुन्हेगारीचा लाल ग़डद रंगही याच मंुबईतला...गिरणगावातल्या गिरणीकामगारांनी या मुंबईला वसवलं...घडवलं... आणि वाढवलंही...अनेक कारणांसाठी ओळखल्या जाणार्‍या मुंबापुरीची 'गिरणी कामगारांची मुंबई' अशी नवी ओळख निर्माण झाली...पण ही नवी ओळख फार काळ टिकू शकली नाही...साल 1982.. दत्ता सामंताच्या नेतृत्वाखाली गिरणीकामगारांनी संप सुरु केला.. जो आज 28 वर्षानंतरही संपलेला नाही...या संपानं इथल्या कामगारांना अक्षरश: देशोधडीला लावलं..कित्येक कुटुंबं रस्त्यावर आली...त्यानंतरचं वास्तव मात्र फारच भीषण होतं...हेच वास्तव जयंत पवार यांनी त्यांच्या 'अधांतर' नाटकातून रंगभूमीवर साकारलं...संपानंतर एका कुटुंबाची झालेली भयाण अवस्था या नाटकानं नेमकेपणानं टिपली...आता हा विषय फक्त नाटकापुरताच मर्यादित राहिलेला नाही, तर लालबाग-परळ या सिनेमाद्वारे तो मोठ्या पडद्यावरही साकारला गेला आहे..अडीच लाख कामगारांची पोटं ज्या गिरणीच्या चाकावर अवलंबून होती ती चाकं जरी थांबली तरी पोटातली भूक मात्र कायम होती...त्याच भुकेनं इथल्या कामगारांना गुन्हेगारीच्या वाटेवर नेलं...गिरणीच्या भोंग्यावर नांदणारी गिरणगावची संस्कृती बंदुकीच्या गोळ्यांना आपलं समजू लागली...गिरण्यांची मुंबई अशी सार्थ ओळख जपणार्‍या मुंबईलाच 'गिरण्या' अडसर वाटू लागल्या...गिरण्यांच्या जागी मॉल्स आणि पंचतारांकित हॉटेल्स बनू लागली आणि मुंबईची जमीन सोन्याची झाली...फक्त एका संपानं बदलेली गिरणगावची ही सगळीच रुपं 'लालबाग परळ' या सिनेमातून महेश मांजरेकरनं साकारलीत...ज्या संपामुळं गुन्हेगारीची पाळंमुळं गिरणगावात रुजली त्या संपाच्या आठवणी या सिनेमाच्या निमित्तानं पुन्हा एकदा ताज्या झाल्या आहेत...

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 9, 2010 05:54 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 9, 2010 05:54 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close