S M L

पोलंडचे राष्ट्रपती विमान अपघातात मृत्यूमुखी

10 एप्रिलरशियात झालेल्या विमान अपघातात पोलंडचे राष्ट्रपती ली कझांस्की यांच्यासह 132 जणांचा बळी गेला आहे. मृतांमध्ये राष्ट्रपतींच्या पत्नीचाही समावेश आहे. तसेच पोलंडचे उपसंरक्षण मंत्री , लष्कर प्रमुख, सेंट्रल बँकेचे गव्हर्नर आणि काही खासदारांचाही मृतांमध्ये समावेश आहे.रशियाच्या स्मोलेन्स्क राज्यातील दक्षिण भागात हा अपघात झाला. पोलंडचे टीयू-154 क्रमांकाच्या विमानाने रनवेवरून उड्डाण घेतल्यानंतर 300 मीटर अंतरावर हा अपघात झाला. दाट धुके असल्याने विमान झाडाला धडकून हा अपघात घडल्याचे रशियाच्या आपत्कालीन मंत्र्यांनी सांगितले. दरम्यान रशियाचे राष्ट्राध्यक्ष त्रिमेदी मेदवेदेव यांनी या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. रशियाचे पंतप्रधान व्लादिमिर पुतिन यांच्या अध्यक्षतेखाली या विमान दुर्घटनेची चौकशी करण्यात येणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 10, 2010 10:43 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 10, 2010 10:43 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close