S M L

अखेर जीएसटी विधेयक राज्यसभेत मंजूर

Sachin Salve | Updated On: Aug 3, 2016 10:44 PM IST

GST Bill03 ऑगस्ट : देशातली कररचना सुटसुटीत आणि एकसूत्री करणारं जीएसटी विधेयक आज अखेर राज्यसभेत मंजूर करण्यात आलं. केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी त्यासाठी राज्यघटनेत दुरुस्ती सुचवणारं विधेयक मांडलं. त्यावेळी त्यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. वस्तू आणि सेवा कर विधेयकामुळे वस्तू आणि सेवांवरचे कर कमी होतील, असा दावा जेटली यांनी केलाय.

गेल्या अनेक वर्षांपासून जीएसटी विधेयकाची चर्चा होत होती. आधी यूपीए सरकारनं हे विधेयक मांडलं होतं, त्याला गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जोरदार विरोध केला होता. नंतर एनडीए सत्तेत आल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी जीएसटी मंजूर होण्यासाठी प्रयत्न सुरू केले. तेव्हा काँग्रेसनं विरोध सुरू केला. भाजप आणि काँग्रेसच्या या राजकारणामध्ये हे विधेयक मात्र रखडलं होतं. गेल्या काही दिवसांपासून जीएसटीसाठी केंद्र सरकारतर्फे जोरदार हालचाली सुरू केल्या होत्या. त्याला अखेर यश आलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 3, 2016 10:44 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close