S M L

गुजरातमध्ये रुपानी पर्व, मुख्यमंत्रिपदाची घेतली शपथ

Sachin Salve | Updated On: Aug 7, 2016 02:19 PM IST

गुजरातमध्ये रुपानी पर्व, मुख्यमंत्रिपदाची घेतली शपथ

गुजरात, 07 ऑगस्ट : विजय रुपानी यांनी गुजरातचे सोळावे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. राज्यपाल ओमप्रकाश कोहली यांनी रुपानी यांनी मुख्यमंत्री पदाची आणि गोपनियतेची शपथ दिली. त्यांच्यासोबत 8 कॅबिनेट आणि 16 राज्यमंत्री शपथ घेतली.

नितीन पटेल यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. यावेळी भाजपचे पक्षाध्यक्ष अमित शहा, ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, अरुण जेटली, हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर उपस्थिती होते.

गुजरातमध्ये आता रुपानी पर्व सुरू झाले आहे. रुपानी यांच्या मंत्रिमंडळात मोठे फेरबदल करण्यात आले आहे. वरिष्ठ मंत्र्यांना विश्रांती देण्यात आलीये. दलित चेहरा असलेले वरिष्ठ मंत्री रमण लाल व्होरा यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले नाही. विधानसभा अध्यक्ष गणपत वसाव या नवीन चेहर्‍याला संधी देण्यात आलीये. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रमणलाल व्होरा यांची विधानसभा सभापतीपदी निवड करण्यात येणार आहे. तर गृहमंत्री रजनी पटेल यांना डच्चू देण्यात आलाय. आनंदीबेन पटेल यांनी गेल्या आठवड्यात मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर विजय रुपानी यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाची धुरा सोपवण्यात आलीये.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 7, 2016 02:19 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close