S M L

विष्णुदास भावे आणि गडकरी रंगायतनच्या स्फोटात सनातन संस्थेचाच हात

15 ऑक्टोबर, मुंबई -नवीमुंबईतल्या विष्णुदास भावे नाट्यगृह आणि ठाण्यातलं गडकरी रंगायतन या दोन्ही ठिकाणी झालेल्या बॉम्बस्फोटाचा सनातन संस्थेशी थेट संबंध असल्याचं स्पष्ट झालं आहे. नांदेड, पुणे, परभणी या ठिकाणी झालेल्या बॉम्बस्फोटांतही जातीयवादी संघटनांचाच संबंध होता, हे पोलीस तपासात स्पष्ट झाल्याचं उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांनी सांगितलं आहे.देशभरात अहमदाबाद, महाराष्ट्र, दिल्ली, कोलाकाता, हैद्राबाद येथे बॉम्बस्फोटांच्या मालिका सुरू होत्या. या स्फोटांमागे इंडियन मुजाहिद्दीन आणि सिमी या संघटनांचा हात असल्याचं स्पष्ट झालं आहे. यासंदर्भात मुंबई पोलिसांनी वीस दहशतवाद्यांनाही पकडलं होतं. पकडलेल्यांपैकी काहींनी हे बॉम्बस्फोट केल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.पण उरलेले बॉम्बस्फोट कोणत्या संघटनांनी केले, हे स्पष्ट होत नव्हतं. ठाणे नवीमुंबईतल्या बॉम्बस्फोटाशी सनातन संस्थेशी थेट संबध आहे. नांदेड- पुणे-परभणीमध्ये जातीयवादी संघटनेचा हात आहे. सिमीप्रमाणे बजरंग दल, विश्व हिंदू परीषद आणि सनातन संस्थेवर बंदी आणावी अशी मागणी होऊ लागली आहे. हिम्मत असेल तर आमच्यावर बंदी आणून दाखवावी, असा इशारा सनातन संस्थेने दिला आहे. तर सरकारला आव्हान देऊ नका, असं आर आर पाटील यांनी सुनावलं आहे. पण उपमुख्यमंत्री आर आर पाटील यांनी हिंदूत्ववादी संघटनाही यात सक्रिय असल्याचं सांगितलं आहे. 'आव्हान देण्याची गरज नाही. योग्य वेळी योग्य ती कारवाई केली जाईल. सनातन संस्थेचा ठाणे नवीमुंबई बरोबरच, इतर काही बॉम्बस्फोटांशी संबंध होता का, याबाबतच आयबीचा अधिकृत अहवाल राज्य सरकारपर्यंत आलेला नाही. पण पोलीस तपासात हा संबंध असल्याचं उघड झालं आहे,' असं गृहमंत्री आर आर पाटील स्पष्ट केलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 15, 2008 07:04 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 15, 2008 07:04 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close