S M L

सुषमा स्वराजांमुळे हनिमूनमधला 'दुरावा' दूर

Samruddha Bhambure | Updated On: Aug 9, 2016 03:06 PM IST

‰úîÝÖÝÖæÖß

09 ऑगस्ट : हनिमूनसाठी परदेशी जायची सर्व तयारी झाली होती. तिकीटही बुक झाली, व्हिसाही मिळाला. पण ऐन वेळी त्याच्या पत्नीचा पासपोर्ट हरवला. मग काय पत्नीला सोडून हे महाशय एकटेच हनिमूनसाठी निघाले. पण हनिमून एकट्याने करायचा कसा? शेवटी फैजान पटेलने आपल्या पत्नीच्या फोटोसहित काढलेला फोटो ट्विटरवर टाकत केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांची मदत मागितली.

ट्विटरवर नेहमी ऍक्टिव्ह असणार्‍या सुषमा स्वराज यांनी नेहमीप्रमाणे दखल घेत लगेच उत्तर दिलं. 'तुमच्या पत्नीला माझ्याशी संपर्क साधायला सांगा. तुमच्यासोबत बाजूच्या सीटवर ती असेल याची खात्री देते', असं ट्विट सुषमा स्वराज यांनी केलं.

सुषमा स्वराज यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे डुप्लिकेट पासपोर्टही मिळवून दिला. तर स्वराज यांनी केलेल्या तत्पर सहकार्यासाठी या दांपत्याने सुषमा स्वराज यांचे आभार मानले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 9, 2016 01:19 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close