S M L

भारतभूमीवर देशाविरोधात नारेबाजी खपवून घेणार नाही - राजनाथ सिंह

Sachin Salve | Updated On: Aug 10, 2016 07:48 PM IST

भारतभूमीवर देशाविरोधात नारेबाजी खपवून घेणार नाही - राजनाथ सिंह

दिल्ली, 10 ऑगस्ट : भारताच्या भूमीवर भारताविरोधात नारेबाजी खपवून घेणार नाही असा इशारा केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी राज्यसभेत दिला. काश्मीरमध्ये जे काही सुरू आहे त्यामागे पाकिस्तानचा हात आहे असा थेट आरोपही सिंह यांनी केला. एवढंच नाहीतर नवाझ शरीफ यांनी यूएन लिहिलेल्या पत्रावर जगातली कोणतीही ताकद आमच्यापासून जम्मू आणि काश्मीर हिसकावून घेऊ शकत नाही असंही सुनावलं.

भारत असा एकमेव देश आहे जिथे सर्व धर्मीय लोकांच्या भावनाचा आदर राखला जातो. इस्लाम धर्म हा कधीही हत्या आणि कुणाला इजा पोहचवण्यासाठी परवानगी देत नाही असा सल्ला राजनाथ सिंह यांनी काश्मीरमधील तरुणांना दिला. तसंच आपल्या धर्माचा प्रचार करण्यास कुणीही आडकाठी आणू शकत नाही. पण आपल्याच देशात आपल्या मातृभूमीवर देशाविरोधात नारेबाजी खपवून घेतली जाणार नाही. काश्मीरमधील जनतेनं अशा नारेबाजी करणार्‍या लोकांना थांबवलं पाहिजे असंही सिंह म्हणाले.

काश्मीरच्या प्रश्नावर येत्या 12 ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे अशी माहितीही सिंह यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 10, 2016 07:31 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close