S M L

राष्ट्रीय एकात्मता परिषदेची आकडेवारी चुकीची - आर.आर.पाटील

15 ऑक्टोबर, मुंबई - महाराष्ट्र हे राज्य दंगेखोर असल्याचा निष्कर्ष राष्ट्रीय एकात्मता परिषदेनं घेतलेलाआढावा सांगतोय. पण राष्ट्रीय एकात्मता परिषदेचा अहवाल चुकीचा असल्याचं मत गृहमंत्री आर.आर. पाटील यांनीव्यक्त केलं आहे. महाराष्ट्रातल्या दंगलींबाबतची नवी आकडेवारी आज जाहीर करण्यात येणार आहे, असंही त्यांनी सांगितलं आहे.महाराष्ट्र हे दंगलखोर राज्य आहे,अशी माहिती गेल्या आठ वर्षांत घेतलेल्या आढाव्यात पुढे आलीय. काही दिवसांपूर्वीच धुळे शहर दंगलींनी धुमसत होतं. या दंगलीचं लोण मध्यप्रदेशापर्यंत पसरलं आहे. या दंगलींमागे राजकीय हात आहे, असेही आरोप होत आहेत. हा निष्कर्ष म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारण्यांना मोठी चपराक आहे. 'दंगलीचं हे राजकारण केवळ मतांसाठी होत आहे', असा आरोप मेधा पाटकर यांनी केला आहे. कुठल्या राजकीय इच्छाशक्तीपोटी राज्यात दंगली घडताहेत, राज्यात आत्तापर्यंत घडलेल्या दंगली ह्या केवळ राजकीय वर्चस्वासाठीच झाल्या, हे ह्या आकडेवारीवरून स्पष्ट होतं. दंगलीच्या कारणावरून देशात महाराष्ट्राची अशी झालेली अवहेलना, ही राज्यातल्या सर्वच राजकीय नेत्यांना धडा शिकवणारी आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 15, 2008 07:36 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 15, 2008 07:36 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close