S M L

स्मिता ठाकरेंचा काँग्रेस प्रवेश निश्चित

स्मिता यांचा काँग्रेस प्रवेश नक्की 13 एप्रिलस्मिता ठाकरेंचा काँग्रेस प्रवेश अखेर निश्चित झाला आहे. येत्या 16 एप्रिलला त्या काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष कृपाशंकर सिंह यांनी ही माहिती दिली आहे. गेले काही दिवस स्मिता ठाकरे काँग्रेसच्या संपर्कात होत्या. काँग्रेस प्रवेशासाठी त्यांनी दिल्लीत जाऊन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचीही भेट घेण्याचा प्रयत्न केला होता. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सून असलेल्या स्मिता ठाकरे काँग्रेसच्या वाटेवर असल्याची बातमी नोव्हेंबरमध्ये आली आणि राजकीय क्षेत्रात काहीशी खळबळ उडाली. शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरेंशी मतभेद असल्याचे स्मिता यांनी नंतरच्या काळात बोलून दाखवले. आणि सोनिया तसेच राहुल गांधींची स्तुती केली. त्याच वेळी त्या काँग्रेसच्या वाटेवर असल्याचे नक्की झाले होते. त्यानंतर त्यांनी थेट काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांची भेट घेऊन काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली. पण काँग्रेसने उतावीळपणा दाखवला नाही. आता जवळपास पाच महिन्यांनी काँग्रेसने स्मिता ठाकरे यांना पक्षात अधिकृत प्रवेश देणार असल्याचे स्पष्ट केले आहे. शिवसेनेशी मतभेद झाल्यानंतर आपल्या मुक्ती फाऊंडेशनच्या माध्यमातून स्मिता ठाकरे सामाजिक काम करत होत्या.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 13, 2010 11:30 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 13, 2010 11:30 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close