S M L

कडक सॅल्युट, निवृत्तीच्या पैशातून माजी सैनिकाने गावासाठी बांधला रस्ता !

Sachin Salve | Updated On: Aug 16, 2016 09:23 AM IST

कडक सॅल्युट, निवृत्तीच्या पैशातून माजी सैनिकाने गावासाठी बांधला रस्ता !

लखनौ, 16 ऑगस्ट : देशाच्या रक्षणासाठी अहोरात्र जवान सीमेवर खडा पहारा देत असता. अखंडपणे देशाची सेवा करणारा हा जवान निवृत्त झाल्यावरही मदतीसाठी सदैव सज्ज राहतो. अशीच एक घटना लखनौमध्ये घडली असून एका माजी सैनिकानं 4 लाख रुपये खर्च करून आपल्या गावात रस्ता बांधला आणि खूप पैसे आहेत म्हणून रस्ता बांधला असंही नाही. तर निवृत्तीनंतर मिळालेले पैसे त्यांनी रस्त्यावर खर्च केले.

लखनौजवळ हीरामपूर नावाचं गाव आहे. भागू राम मौर्य हे त्या गावाचे रहिवासी आहे. निवृत्तीनंतर त्यांना जाणवलं की गावातून ये-जा करणं खूप कठीण आहे. म्हणून त्यांनी ठरवलं रस्ता बांधायचा. पण यासाठी गावातल्या काही लोकांच्या जमिनीचा थोडासा भाग लागणार होता. साहाजिकच, त्याला विरोध झाला. पण भग्गुराम यांनी त्या सर्वांना आपला मुद्दा पटवून दिला. हेही सांगितलं की, रस्त्याचा वापर फक्त ये-जा करायला नाही, तर मॉर्निंक वॉकसाठीही होईल. गावकर्‍यांना त्यांचं म्हणणं पटलं खुद्द भग्गुराम यांनी निवृत्तीचे चार लाख रुपये या रस्ते बांधणीसाठी खर्च केले. आणि अखेर गावकर्‍यांना चांगला रस्ता मिळाला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 16, 2016 09:23 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close