S M L

भारतीय पाणबुड्यांबद्दलची गोपनीय माहिती लीक

Samruddha Bhambure | Updated On: Aug 24, 2016 09:11 PM IST

भारतीय पाणबुड्यांबद्दलची गोपनीय माहिती लीक

23 ऑगस्ट : भारतीय नौदलातील 'स्कॉर्पिअन' प्रकारातील पाणबुड्यांबद्दलची गोपनीय आणि संवेदनशील माहिती लीक झाल्याने भारताला मोठा धक्का बसल्याचं मानलं जात आहे. फ्रान्समधील 'डीसीएनएस' या पाणुबड्यांची बांधणी करणार्‍या कंपनीची तब्बल 22 हजार 400 पानांची कागदपत्रं लीक झाल्याचं वृत्त ऑस्ट्रेलियन प्रसारमाध्यमांनी प्रसिद्ध केलंय. याप्रकरणी संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी नौदलाला चौकशीचे आदेश दिले आहेत.

'भारताच्या स्कॉर्पिन पाणबुडीची माहिती लीक झाली आहे का याच्या चौकशीचे आदेश नौदलाला देण्यात आले आहेत. तसंच या लीक झालेल्या माहितीचा भारताशी काही संबंध आहे का? हे तपासण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. जर काही माहिती लीक झाली असेल तर संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल.' अशी माहिती संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी दिली.

भारतीय नौदलात लवकरच रुजू होणार्‍या फ्रान्स बनावटीच्या स्कॉर्पिन पाणबुडीबद्दलच्या लीक झालेल्या कागदपत्रांमध्ये या पाणबुडीची कार्यप्रणाली, युद्धप्रणाली, टॉर्पिडो प्रेक्षपण, दिशादर्शन प्रणालीच्या कागदपत्रांचा समावेश असण्याची शक्यता आहे. भारताच्या नौदलात या पाणबुड्यांचा समावेश होतोय. त्यामुळं शत्रुराष्ट्रांच्या हाती ही संवेदनशील माहिती लागल्यास भारतीय संरक्षण यंत्रणेला मोठा फटका बसण्याची भीती आहे.

ऑस्ट्रेलियन बनावटीच्या स्कॉर्पिन पाणबुड्या या अत्याधुनिक असून फार संथ आणि शांतपणे पाण्याखाली राहू शकतात. त्यामुळे त्यांचा वावर शत्रूच्या लक्षात येत नाही. पण ही अतिशय गोपनीय माहिती उघड झाल्याने भारतीय नौदलाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 24, 2016 02:16 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close