S M L

पाकिस्ताननेच काश्मीरमधील परिस्थिती बिघडवली- मेहबूबा मुफ्ती

Samruddha Bhambure | Updated On: Aug 27, 2016 01:57 PM IST

पाकिस्ताननेच काश्मीरमधील परिस्थिती बिघडवली- मेहबूबा मुफ्ती

27 ऑगस्ट : पाकिस्ताननेच काश्मीरमधील पाकिस्ताननेच परिस्थिती बिघडवली असून त्यांच्याकडून युवकांना आंदोलनासाठी भडकवण्यात येत आहे. त्यांच्यामुळेच येथील वातावरण गढूळ झाल्याचे जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी म्हटलं आहे.

हिज्बुल मुजाहिदीनचा कमांडर बुऱ्हाण वणीला सुरक्षा रक्षकांनी ठार मारल्यानंतर काश्मीर खोऱ्यात आंदोलनाला सुरवात झाली होती.गेल्या 50 दिवसांपासून आंदोलन सुरूच असून, अनेक हिंसक घटना घडल्या आहेत. आतापर्यंत काश्मीर खोऱ्यात हिंसाचारात 50 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. काश्मीरमधील अनेक जिल्ह्यांत अद्याप संचारबंदी कायम आहे. त्यामुळे इथलं जनजीवन विस्कळीत झालं आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना मुफ्ती म्हणाल्या की, पाकिस्तानमुळेच जम्मूतील वातावरण खराब झालं आहे. जम्मूमधील तरुणांचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. काश्मीरमधील परिस्थितीबद्दल पंतप्रधान चिंते असून, काश्मीरमधील हिंसाचार थांबवा अशी त्यांची इच्छा आहे. पंतप्रधान पाकिस्तानबरोबर चर्चेसाठी स्वत: पुढे येत आहेत. आपले गृहमंत्री राजनाथसिंह पाकिस्तानला जाऊन आले. पण, पाकिस्तानकडून कोणतेच पाऊल उचलले जात नाही. काश्मीर खोऱ्यातील परिस्थिती सुधारण्यासाठी पीडीपी आणि भाजपचे सरकार प्रयत्न करत आहे. खोऱ्यात शांतता प्रस्थापित होणे हे आमचे लक्ष्य आहे. माझ्या मते काश्मीरचा प्रश्न पंतप्रधान मोदीच सोडवू शकतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 27, 2016 01:57 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close