S M L

'इस्रो'कडून स्क्रॅमजेट इंजिनची यशस्वी चाचणी

Samruddha Bhambure | Updated On: Aug 28, 2016 01:39 PM IST

'इस्रो'कडून स्क्रॅमजेट इंजिनची यशस्वी चाचणी

28 ऑगस्ट : भारतीय अवकाश संशोधन संस्थेनं (इस्रो) आज रविवारी श्रीहरिकोटा इथल्या उपग्रह प्रक्षेपण केंद्रातून स्वदेशी बनावटीच्या स्क्रॅमजेट इंजिनची यशस्वी चाचणी केली. हे इंजिन वातावरणातील ऑक्सिजनच्या मदतीने त्यातील इंधन प्रज्ज्वलित करते.

 श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन उपग्रह प्रक्षेपण केंद्रातून सकाळी सहा वाजता दोन स्क्रॅमजेट इंजिन आरएच - 560 या रॉकेटद्वारे ही चाचणी घेण्यात आली. पनर्वापरायोग्य आरएलव्ही यानात हे स्क्रॅमजेट इंजिन उपयोगात आणता येणार आहे. या इंजिनांमुळे प्रक्षेपण खर्च आणखी कमी होणार आहे, असं वैज्ञानिकांचं म्हणण आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 28, 2016 12:25 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close