S M L

मन की बात : मोदींनी सिंधू, साक्षी आणि दीपा यांचं केलं कौतुक

Samruddha Bhambure | Updated On: Aug 28, 2016 04:18 PM IST

28 ऑगस्ट : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (रविवारी) मन की बातद्वारे देशवासीयांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी रिओ ऑलिम्पिकपासून ते काश्मीरपर्यंतच्या विषयावर मोदींनी भाष्य केलं.

रिओ ऑलिम्पिकमुळे भारताला दोन पदक मिळाले. देशातल्या मुलींनी आपण  कोणत्याही क्षेत्रात कोणापेक्षाही कमी नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध केलं असल्याचं सांगत मोदींनी ऑलिम्पिकवीरांचं कौतुक केलं. तसंच 5 सप्टेंबरला 'शिक्षक दिना'चा उल्लेख करत रौप्यपदक विजेत्या पी व्ही सिंधूचे प्रशिक्षक पी गोपीचंद यांचेही मोदींनी कौतुक केले. खेळाप्रति गोपीचंद यांनी दाखवलेली श्रद्धा आणि त्यासाठी घेतलेल्या मेहनतीला मी सलाम करतो. ते उत्तम शिक्षक आहेत, असेही मोदी म्हणाले. याशिवाय क्रीडा क्षेत्रात भारताला आणखी पल्ला गाठायचा आहे असंही त्यांनी नमूद केले.

modi man ki baat

त्याचबरोवर काश्मीरमधील हिंसाचारावरुन बोलताना मोदींनी पाकिस्तानवरही निशाणा साधला आहे. काश्मीरमध्ये हिंसाचारात तरुण असो किंवा जवान या पैकी कोणाचाही बळी गेल्यास संपूर्ण देशाचेच नुकसान होतं असं मोदींनी म्हटलं आहे. काश्मीरमधल्या तरुणांना जी लोकं हातात दगड घेण्यासाठी उचकवत आहेत त्यांना एक दिवस उत्तर द्यावं लागेल असंही मोदींनी म्हटलं. शेजारी राष्ट्रांसोबत मैत्रीपूर्ण संबंध राहावेत याकडे आमचा कल असतो असं त्यांनी आवर्जून सांगितलं.

सध्या गणेशोत्सव आणि दुर्गापूजाची तयारी सुरू आहे. या उत्सवात आपण मातीच्या मुर्त्यांचा वापर करुन पर्यावरणाचे रक्षण करावं असं आवाहन मोदींनी केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 28, 2016 04:18 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close