S M L

जी सॅट - 4 भरकटला

15 एप्रिलसंपूर्ण भारतीय बनावटीचे क्रायोजेनिक इंजीन असलेल्या जी सॅट - 4 या उपग्रहाचे श्रीहरीकोटा इथून यशस्वी उड्डाण झाले. पण लाँचिंगनंतर 500 सेकंदातच हा उपग्रह भरकटला आहे. श्रीहरी कोटातील नियंत्रण कक्षाशी या उपग्रहाचा संपर्क तुटला आहे. सिग्नल मिळत नसल्याने शास्त्रज्ञ चिंतेत पडले आहेत. तर इस्त्रोने हे लाँचिंग अपयशी झाल्याचे इस्त्रोने स्पष्ट केले आहे. इस्त्रोचे संचालक के. राधाकृष्णन यांनी ही माहिती दिली आहे. उपग्रहामधील दोन छोट्या क्रायोजेनिक इंजिनात दोष निर्माण झाला. दुसर्‍या टप्यातील दोन छोट्या क्रायो इंजीन्सनी पेटच घेतला नाही, असे त्यांनी सांगितले आहे.यामुळे भारतीय शास्त्रज्ञांची 18 वर्षांची मेहनत फुकट गेली आहे. उड्डाण केल्यानंतर 36 हजार किलोमीटरवर हे लाँचिंग होणार होते. पण संपर्क तुटला आहे. तर शास्त्रज्ञ अजूनही संपर्क प्रस्थापित होण्यासाठी प्रयत्न करत आहेत. GSLV-D- 3 या रॉकेटमधून हा उपग्रह सोडला गेला. दळणवळण आणि नॅव्हिगेशनसाठी या उपग्रहाची मदत होणार होती. स्वदेशी बनावटीचे क्रायोजनिक इंजीन वापरण्यात येत असल्याने इस्रोच्या आणि भारताच्या दृष्टीने हा महत्त्वाचा टप्पा मानला जात होता. हा प्रकल्प यशस्वी ठरला असता तर भारत अमेरिका, रशिया, फ्रान्स, जपान आणि चीन यांच्या रांगेत जाऊन बसला असता.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 15, 2010 11:15 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 15, 2010 11:15 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close