S M L

शशी थरूर एकाकी

16 एप्रिलआयपीएलच्या वादात अडकलेले परराष्ट्र राज्यमंत्री शशी थरूर आज एकाकी पडल्याचे चित्र राजधानीत दिसले. काँग्रेसने त्यांची बाजू घेण्याचे टाळून त्यांना स्वत:च लोकसभेत निवेदन करण्यास सांगितले. त्याप्रमाणे थरूर यांनी सभागृहात लेखी निवेदन ठेवले. पण विरोधकांच्या गोंधळामुळे थरूर यांना निवेदन करणे शक्यच झाले नाही. थरूर यांनी आपल्या बचावासाठी यावेळी केरळ कार्ड वापरले. त्यात त्यांनी म्हटले, आपण जे काही केले ते केरळच्या हितासाठी. कोची टीमने लिलाव जिंकल्याने काही जणांना अनपेक्षित धक्का बसला. त्यामुळेच सार्वजनिक जीवनात माझी प्रतिमा मलीन करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. हा वाद क्रीडा क्षेत्रासाठी अयोग्य आहे. कोचीच्या बोलीत कोणताही आर्थिक गैरव्यवहार झाला नाही. आयपीएलमधील भागीदार केवळ एक महिला आहे, म्हणून तिच्यावर आरोप करणे चुकीचे आहे, असे थरूर यांनी सुनंदा पुष्कर यांच्याबाबत म्हटले.आपल्यावरील सर्व आरोप खोटे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. माझ्या पदाचा मी कुठल्याही पद्धतीने गैरवापर केला नसल्याचा दावा यावेळी थरूर यांनी केला.थरूर यांना क्लिन चीट नाहीदरम्यान सोनिया गांधींनी शशी थरूर यांना अजून क्लिन चीट दिलेली नाही. काल संध्याकाळी थरूर यांच्या मुद्द्यावर सोनियांनी काँग्रेसच्या पाच महत्त्वाच्या मंत्र्यांची बैठक घेतली. कोची टीमच्या डीलमध्ये थरूर यांचा आर्थिक फायदा झालाय का, याची माहिती काढण्याचे आदेश सोनियांनी या मंत्र्यांना दिले आहेत. थरूर यांच्याबाबतचा अंतिम निर्णय मात्र पंतप्रधान परतल्यानंतरच होणार आहे. सुनंदा यांच्या नावाची चर्चाया सगळ्या वादात शशी थरूर यांची मैत्रीण असणार्‍या सुनंदा पुष्कर यांचेही नाव समोर येत आहे. आणि आता काही आश्चर्यकारक बाबीही समोर येत आहेत...यापुढे सुनंदा यांनी आयपीएल टीममध्ये एकही पैसा गुंतवला नाही तरी त्यांचा टीममधला हिस्सा वाढतच राहील. कारण या टीमसाठी करारच तसा करण्यात आला आहे.या टीमच्या शेअरहोल्डर्सनी केलेल्या करारानुसार एकूण गुंतवणुकीच्या 25 टक्के हिस्सा लगेच हस्तांतरित करता येणार नाही.या 25 टक्क्यांपैकी 19 टक्के म्हणजे जवळपास 70 कोटी रुपये सुनंदा यांच्या नावावर आहेत.उरलेले 75टक्के गुंतवणूकदार नवीन पैसे गुंतवत असताना सुनंदा यांना मात्र मोबदला मिळत राहील.याशिवाय सुनंदा यांच्यासारख्या खास गुंतवणूकदारांना 2 वर्षांनंतर हे शेअर्स विकताही येतील.इतरांना मात्र सहजासहजी असे करता येणार नाही.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 16, 2010 08:39 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 16, 2010 08:39 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close