S M L

रवी गायकवाड यांना सरकारची नोटीस

16 एप्रिलआयपीएल कोची टीम प्रकरणी रवी गायकवाड यांना महाराष्ट्र सरकारने नोटीस पाठवली आहे. रवी गायकवाड हे राँदेवू स्पोर्ट्सचे शैलेंद्र गायकवाड यांचे भाऊ आहेत. ते मुंबईत आरटीओ ऑफिसर होते. विदेशी गाड्या खरेदी संदर्भातील 100 कोटींचा घोटाळ्यामध्ये सहभागी असल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. या प्रकरणाची विभागीय चौकशी सुरू असून रवी गायकवाड यांची परभणी इथे तडकाफडकी बदली करण्यात आली होती. पण तब्येतीच्या कारणास्तव ते कामावर रुजू झाले नाहीत. आता त्यांना मेडिकल बोर्डासमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात येणार आहेत. तसेच त्यांनी आयपीएलमध्ये स्वत:च्या नावे काही गुंतवणूक केली आहे का, याबाबतसुद्धा विचारणा केली जाणार असल्याचे समजते.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 16, 2010 10:39 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 16, 2010 10:39 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close