S M L

काश्मीरमध्ये 2 वर्षात पहिल्यांदाच लष्कर तैनात

Sachin Salve | Updated On: Sep 10, 2016 05:41 PM IST

काश्मीरमध्ये 2 वर्षात पहिल्यांदाच लष्कर तैनात

10 सप्टेंबर : जम्मू आणि काश्मीरच्या बहुतांश भागात अजूनही संचारबंदी कायम आहे आणि स्थिती सुधारण्यासाठी गेल्या दोन वर्षांत पहिल्यांदाच लष्कराला पाचारण करण्यात आलंय.

काश्मीरच्या ग्रामीण भागातून दोन वर्षापूर्वी लष्कर काढून तिथं सीआरपीएफला तैनात करण्यात आलं होतं. पण सध्याची संवेदनशिल स्थिती पहाता ज्या चार जिल्ह्यात सर्वात जास्त हिंसा उसळलीय तिथं पुन्हा लष्कर तैनात करण्यात आलंय. हे चार जिल्हे आहेत पुलवामा, शोपियान, कुलगाम आणि अनंतनाग.

मंगळवारी बकरी ईद आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर फुटीरतावाद्यांनी 'चलो यूएन'ची घोषणा दिलीये. त्यामुळे श्रीनगरच्या डाऊनटाऊन भागात असलेल्या ईदगाह मैदानावर मोठ्या प्रमाणात गर्दी जमेल असा अंदाज आहे. ही गर्दी पुन्हा हिंसक होऊ शकते. त्याच पार्श्वभूमीवर लष्कराला तैनात करण्यात आलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 10, 2016 01:22 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close