S M L

पुनर्विकासात रहिवाशांना डावलले

उदय जाधव, मुंबई16 एप्रिल मुंबईत अनेक मोक्याच्या ठिकाणी जुन्या बिल्डिंगच्या जागेवर पुनर्विकासाचे प्रकल्प सुरू आहेत. पण वाढीव एफएसआयचा फायदा काही मोजकेच लोेक उचलण्याचा प्रयत्न करत असल्याचे अनेक ठिकाणी दिसून येत आहे. त्यामुळे रहिवाशांना त्यांच्या हक्कांपासून डावलले जाण्याचे अनेक प्रकार पुढे येत आहेत. मुलुंडच्या जीवन नगर सोसायटीतही असा प्रकार झाला आहे. या सोसायटीत 272 कुटुंबे राहतात. या सोसायटीचा पुर्नविकास करण्याचे ठरले. त्यासाठी समिती बनवून रहिवाशांपैकीच काहींना पदाधिकारीही बनवण्यात आले. पण वाढीव एफएसआयचा फायदा सर्वांना मिळू नये यासाठी समितीते पदाधिकारी प्रयत्न करत असल्याचा आरोप काही रहिवासी करत आहेत. बिल्डरशी करार करण्याआधाची मुंबईत अशाप्रकारे स्थानिक रहिवाशांमध्ये वाद निर्माण होण्याच्या घटना घडत आहेत.यावर कायदेशीर बाबींचे मार्गदर्शन होणे आवश्यक आहे.तब्बल 2 लाख 39 हजार 599 चौरस फुटांच्या जमिनीवर हा पुर्नविकासाचा प्रकल्प होणार आहे. त्यामुळे बिल्डरचा फायदा तर होणारच आहे. पण ज्यांच्या हक्काची ही जागा आहे, त्यांनाही बरोबरीचा वाटा मिळावा, अशी अपेक्षा आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 16, 2010 02:30 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 16, 2010 02:30 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close