S M L

थरूर यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव

17 एप्रिलपदाचा गैरवापर केला नाही, असे स्पष्टीकरण परराष्ट्र राज्यमंत्री शशी थरुर यांनी दिले असले तरी त्यांच्यावरची टांगती तलवार अजूनही कायम आहे. थरुर यांनी पदाचा स्वतःहून राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेसच्या नेत्यांकडून होत आहे. पंतप्रधान मनमोहन सिंग विदेश दौर्‍यावरून आज भारतात परतणार आहेत. पंतप्रधान आल्यावर थरुर यांच्यासंदर्भात निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. थरुर यांच्याबाबत चौकशी करणार्‍या काँग्रेसच्या समितीला आयपीएलच्या कोची टीमच्या डीलमध्ये गैरव्यवहार झाल्याचे आढळून आले. थरुर यांनी दिलेल्या स्पष्टीकरणावर पक्ष समाधानी झालेला नाही. पंतप्रधान परतल्यावर थरुर त्यांच्याकडे आपली बाजू मांडतील. पंतप्रधान आज सोनिया गांधी आणि ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांची भेट घेण्याची शक्यता आहे. सोमवारी संसदेचे कामकाज सुरू होण्यापूर्वी थरुर यांच्यासदंर्भात निर्णय घेतला जाऊ शकतो.थरूर यांनी मानले आभारदरम्यान थरुर यांनी ट्विटरवर आयपीएलच्या वादासंदर्भात मत व्यक्त केले आहे. या वादात आपल्या बाजूने राहणार्‍या लोकांचे त्यांनी आभार मानले आहेत. मला पाठिंबा दिल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद. तुम्हीच नव्या भारताचे नायक आहात. आम्ही आपल्या देशात परिवर्तनाची अपेक्षा करतो. पण त्यासाठीची योजना आपल्याकडे तयार नाही, असे त्यांनी ट्विटरवर म्हटले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 17, 2010 10:02 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 17, 2010 10:02 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close