S M L

2008च्या एम्ब्रायेर विमान कराराची सीबीआय चौकशी व्हावी - संरक्षण मंत्रालय

Samruddha Bhambure | Updated On: Sep 14, 2016 02:32 PM IST

2008च्या एम्ब्रायेर विमान कराराची सीबीआय चौकशी व्हावी - संरक्षण मंत्रालय

14 सप्टेंबर :  काँग्रेस पुन्हा एकदा संरक्षण करारामुळे अडचणीत येणार असं दिसतंय. 2008 साली यूपीए सरकारनं ब्राझिलच्या एम्ब्राएर विमान कंपनीबरोबर 3 विमानांसाठी करार केला होता. आजच्या भावाप्रमाणं हा बाराशे कोटींचा हा करार होता. यासाठी या कंपनीनं दलालांना पैसे दिले असा आरोप ब्राझिलमध्ये होतोय. यामुळे आता या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी करत संरक्षण मंत्रालयानं सीबीआयला पत्र लिहिलं आहे. या करारादरम्यान कोणता आर्थिक गुन्हा घडला का, याची चौकशी आता सीबीआयकडून होऊ शकते. त्यामुळे याच कारणानं तत्कालीन संरक्षणमंत्री ए.के.अँटनी अडचणीत येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 14, 2016 11:32 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close