S M L

मुंबई विद्यापीठाची होणार चौकशी

19 एप्रिलमुंबई विद्यापीठातील परीक्षा पद्धतीतील घोळ, कुलगुरूंची निवड प्रक्रिया, बेकायदेशीर नियुक्त्या आणि प्रश्नपत्रिका छपाईतील घोळासंदर्भात आता एका महिन्यात चौकशी होणार आहे. चौकशीनंतर संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री राजेश टोपे यांनी विधानपरिषदेत दिले. मुंबई विद्यापीठाच्या परीक्षेच्या वेळी हॉल तिकिटावरच्या विषयांची अदलाबदल झाल्याने 3 हजार विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित रहावे लागले. यावर शिवसेनेचे आमदार दीपक सावंत यांनी अल्पकालीन चर्चा उपस्थित केली होती. मुंबई विद्यापीठाच्या विभाजनासाठी नेमलेल्या समितीचा अहवाल तीन महिन्यात येईल. त्यानंतरच याबाबतचा निर्णय घेण्यात येईल. तसेच ठाणे आणि डोंबिवली- कल्याण येथील उपकेंद्राच्या निर्मितीसाठी अर्थसंकल्पात तरतूद केल्याने हे काम 30 एप्रिलपर्यंत सुरू करू असे आश्वासनही टोपे यांनी दिले.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 19, 2010 11:48 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 19, 2010 11:48 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close