S M L

दिल्लीत दिवसाढवळ्या माणुसकीचा 'खून' !

Sachin Salve | Updated On: Sep 20, 2016 04:48 PM IST

दिल्लीत दिवसाढवळ्या माणुसकीचा 'खून' !

दिल्ली, 20 सप्टेंबर :  देशाचा गाडा ज्या राज्यातून हाकला जातो त्या राजधानी दिल्लीमध्ये दिवसाढवळ्या माणुसकीचा 'खून' झालाय. एका माथेफिरुने तरुणीवर चाकूने प्राणघातक हल्ला चढवला. या माथेफिरुने तब्बल 30 वार करून  तरुणीचा जीव घेतला. शरमेची बाब म्हणजे हा सगळा थरार भर दुपारी रस्त्यावर सुरू होता. पण या तरुणीचा जीव वाचवण्यासाठी कुणीही पुढं आला नाही.

राजधानी दिल्ली नेहमी राजकीय घटनाक्रमामुळे व्यस्त असते. पण, याच राजधानीत माणुसकीचा कसा खून झाला याचं चित्र सीसीटीव्हीमध्ये कैद झालंय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माथेफिरु तरुण हा सुरेंद्र बुराडी (34 ) आहे. याच परिसरात सुरेंद्रचं कॅम्प्युटर ट्रेनिंग इंस्टिट्यूट आहे. त्याच्या इंस्टिट्यूटमध्ये करुणा नावाची तरुणी शिकण्यासाठी येत होती.  सुरेंद्र हा करुणावर  एकतर्फी प्रेम करायचा. त्याने तिला प्रपोजसुद्धा केलं होतं. पण करुणाने स्पष्ट नकार दिला होता. करुणाने नकार दिल्यामुळे सुरेंद्र निराश झाला होता.

नैराश्यातून त्याने करुणाचा काटा काढण्याचा डाव आखला. करुणा घरातून किती वाजता  निघते ?, कुठे जाते याची रेकी सुद्धा केली. आज सकाळी जेव्हा करुणा  बुराडी चौकातून घराकडे येत होती तेव्हा त्याने तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. पण करुणाने नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या सुरेंद्रने तिच्यावर हल्ला चढवला. तब्बल 30 वेळा त्याने चाकूने तिच्यावर वार केले. रस्त्यावरुन येणाऱ्या जाणाऱ्या लोकांनी पुढं येण्याचा प्रयत्न केला.

पण, त्याला अडवण्यास कुणाचीही हिमंत झाली नाही. एवढंच नाहीतर चार ते पाच लोकं त्याच्याजवळ पोहोचली सुद्धा पण फक्त बघ्याची भूमिका घेऊन लोकांनी पळ काढला. हा सगळा थरार सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला. जर काही लोकांनी थोडी जरी हिंमत दाखवून  माथेफिरु सुरेंद्रला अडवले असते तर तरुणीचा जीव वाचू शकला असता. निर्भया प्रकरणाच्या वेळी अवघा देश दिल्लीच्या घटनेमुळे सुन्न झाला होता. दिल्लीकरही हातात कँडेल घेऊन रस्त्यावर उतरला होता. पण आजचा दिल्लीकर या घटनेत फक्त कँडल घेऊन मार्च पुरताच असल्याचं स्पष्टपणे अधोरेखित झालं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 20, 2016 02:29 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close