S M L

रेल्वे बजेट 'यार्डात', आता एकच बजेट !

Sachin Salve | Updated On: Sep 21, 2016 02:20 PM IST

रेल्वे बजेट 'यार्डात', आता एकच बजेट !

21 सप्टेंबर : भारताचा गरीब रथ म्हणून ओळखल्या जाणा•या भारतीय रेल्वेचा अर्थसंकल्प आता यार्डात पोहोचलाय. तब्बल 92 वर्षांची ही परंपरा मोदी सरकारने आता मोडीत काढली आहे. यापुढे एकच सर्वसमावेशक बजेट सादर होणार आहे. पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यातच सर्वसमावेशक बजेट सादर होणार आहे.

भारतावर दीडशे वर्ष राज्य करुन ब्रिटीश भारत सोडून गेले पण भारताला दळणवळणाला मोठा हातभार लावणारी रेल्वे देऊन गेले. भारताने पुढे भारतीय रेल्वे असं नामाकरण करुन अखंडपणे रेल्वे सेवा कार्यरत ठेवली. गरीब रथ म्हणून अशी तिला ओळखही मिळाली. दरवर्षी रेल्वेच्या विकासकामांसाठी रेल्वे बजेट सादर केला गेला. तब्बल 92 वर्ष ही परंपरा कायम होती. ज्या ज्यावेळी बजेट सादर झालं त्यावेळी नव्या गाड्या, भाडेवाढ, नव्या योजना आणि दरवर्षी रेल्वेच्या कामकाजाचा लेखाजोखा जनतेसमोर मांडला गेला.

पण आर्थिक वर्षात बजेटची अंमलबजावणी करण्यात उशीर होत होती. त्यामुळे मोदी सरकारने दोन्ही बजेट एकत्र करण्याचा निर्णय घेतला. याबाबत विवेक देबरॉय समितीनं याची शिफारसही केली होती. आज केंद्रीय मंत्रिमंडळानं या प्रस्तावाला मंजुरी दिली. त्यामुळे या पुढे आता एकच जनरल बजेट सादर होणार आहे. पुढील वर्षी फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवड्यात बजेट सादर करण्याचा सरकार प्रयत्न करणार आहे. आर्थिक नियोजन करण्याच्या रेल्वेच्या स्वायत्तेवर कोणतीही टाच येणार नाही, अशी माहिती अरुण जेटलींनी पत्रकार परिषदेत दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 21, 2016 02:20 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close