S M L

मं. वि. राजाध्यक्ष यांचे निधन

19 एप्रिलज्येष्ठ समीक्षक मं. वि. तथा मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष यांचे वृद्धापकाळाने मुंबईतील साहित्य सहवासमध्ये निधन झाले. ते 96 वर्षांचे होते. समीक्षक विजया राजाध्यक्ष यांचे ते पती होत. त्यांनी अहमदाबाद येथील इस्माइल युसूफ, कोल्हापुरातील राजाराम तसेच मुंबईतील एल्फिन्स्टन कॉलेजात इंग्रजी विषयाचे अध्यापन केले. पाठ्यपुस्तक मंडळाचे मुख्य संपादक म्हणूनही त्यांनी काम केले. अभिरुची मासिकातून त्यांनी लिखाणाची सुरुवात केली.त्याची साहित्यसंपदा पुढीलप्रमाणे- खर्डेघाशी (1963)आकाशभाषिते (1963)शालजोडी (1983)अम्लान (1983)पंचम (1984)पाक्षिकी (1986)शब्दयात्रा (1986)भाषाविवेक (1997)वाड्.मयविषयक तसेच सामाजिक सांस्कृतिक विषयांवर त्यांनी मार्मिक, खुसखुशीत लिखाण केले. कुसुमावती देशपांडे यांच्या सहकार्याने त्यांनी हिस्ट्री ऑफ लिटरेचर हा ग्रंथही लिहिला. ज्ञानपीठ पुरस्कार निवड समिती, तसेच साहित्य अकादमीचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम केले.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 19, 2010 05:29 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 19, 2010 05:29 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close