S M L

पाकची जिरवण्यासाठी भारताचं 'पाणीअस्त्र', मोदी आज घेणार निर्णय

Samruddha Bhambure | Updated On: Sep 26, 2016 03:53 PM IST

पाकची जिरवण्यासाठी भारताचं 'पाणीअस्त्र', मोदी आज घेणार निर्णय

26 सप्टेंबर : उरी हल्ल्यानंतर पाकला अद्दल घडवण्यासाठी भारतनं कंबर कसली असून यासाठी 'पाणीअस्त्र' वापरलं जाऊ शकतो. यासाठी आज दुपारी 12 वाजता पंतप्रधान मोदी, जलसंधारणमंत्री उमा भारती आणि काही वरिष्ठ अधिकाऱ्यांची यासंदर्भात बैठक होणार आहे.

भारत पाकची जिरवण्यासाठी 56 वर्षांपूर्वी झालेला सिंधू पाणीवाटप करार रद्द करण्याच्या विचारत आहे. उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने ही योजना आखली आहे. त्यावर आज दुपारच्या बैठकीत शिक्कामोर्तब झाले, तर पाकिस्तानची मोठी कोंडी होणार आहे.

दोनच दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही केरळमधील आपल्या सभेत पाकिस्तानची जिरवण्यासाठी त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर एकटं पाडण्याचं प्रयत्न सुरू असल्याचे सांगितलं होतं. यासाठी सिंधू नदीच्या प्रवाहाला ब्रेक लावूनच याची सुरुवात होऊ शकते. पाणी पुरवठा पूर्णपणे बंद केलं जाण्याची शक्यता जरी कमी असली तरी पाकला इशारा देण्यासाठी या कराराचा आढावा घेतला जातोय, अशी माहिती मिळतेय.

काय आहे सिंधू पाणी करार?

- 1960 साली झाला करार

- पंडित नेहरू आणि आयुब खान यांच्या सह्या

- भारत आणि पाकमध्ये पाणी वाटपाबाबतचा करार

- सिंधू नदीचं 80 टक्के पाणी पाकला मिळतं

- रावी, बियास आणि सतलज नद्यांवर पूर्णपणे भारताचा हक्क

- सिंधू, झेलम आणि चेनाबच्या पाण्यावर पाकचा हक्क

- 3 युद्ध झाली तरी हा करार मोडला नाही

- जगातला सर्वात यशस्वी पाणी करार

- पाकच्या पंजाब प्रांतासाठी सिंधूचं पाणी अतिशय महत्त्वाचं

करार मोडण्याचे फायदे

- पाकला चांगलीच अद्दल घडेल

- भारत पाण्याचंही अस्त्र उगारू शकतो याची पाकला जाणीव होईल

- पाकच्या जनतेचा तिथल्या सरकारवर दबाव वाढेल

- पाककडे पाण्याचं अस्त्र नाही

- युद्ध लढण्यापेक्षा हा उपाय सोपा आणि स्वस्त

करार मोडण्याचे तोटे

- करार मोडणं निसर्ग आणि मानवतेच्या विरोधात

- पंजाब आणि काश्मीरमध्ये पूर येऊ शकतो

- आंतरराष्ट्रीय समूदायाकडून भारतावर टीका होईल

- जगात भारताची विश्वसनीयता कमी होईल

- पाकला एकाकी पाडण्याच्या प्रक्रियेत अडथळे येतील

- बांगलादेश आणि भूतानसारखे देश अस्वस्थ होतील

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 26, 2016 12:29 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close