S M L

सुषमा स्वराज आज 'यूएन'मध्ये नवाज शरीफ यांना देणार प्रत्युत्तर

Samruddha Bhambure | Updated On: Sep 26, 2016 02:56 PM IST

Sushma_B_25122015

26 सप्टेंबर :  भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आज (सोमवारी) संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत जगाला संबोधित करणार आहेत. यामध्ये ते  पाकिस्तानला त्या काय उत्तर देणार याकडे अवघ्या जगाचं लक्ष लागलं आहे.

उरीमधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान संबंध कमालीचे ताणले आहेत. दहशतवादी कारवायांना लगाम घालण्यात अपयशी ठरलेल्या पाकिस्तानने भारतावरच खोटे आरोप केले आहेत. शरीफ यांच्या यूएनच्या भाषणानंतर सर्वच भारतीयांमध्ये असंतोषाची लाट आहे. नवाज शरीफ यांच्या काश्मीरबाबतच्या मुक्ताफळांना त्या उत्तर देतील, अशी अपेक्षा आहे.

  उरी हल्ल्याबाबत पाकचं पितळ उघडं पाडणे, पाकिस्तानला एकाकी पाडण्याचं जगाला आवाहन करणे, आणि भारताची सहनशक्ती संपलीय हे ठासून सांगणे, हे काही मुद्दे सुषमांच्या भाषणात अपेक्षित आहेत.  विशेष म्हणजे सुषमा स्वराज पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर कसा उघडा पाडतील, याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे. भारतीय वेळेनुसार रात्री साडे नऊ नंतर त्यांच्या भाषणाला सुरुवात होईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 26, 2016 11:23 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close