S M L

पाकमध्ये होणाऱ्या सार्क परिषदेवर भारताचा बहिष्कार

Sachin Salve | Updated On: Sep 27, 2016 11:02 PM IST

पाकमध्ये होणाऱ्या सार्क परिषदेवर भारताचा बहिष्कार

27 सप्टेंबर : उरी दहशतवादी हल्ल्याचा परिणाम आता सार्क परिषदेवरही होणार आहे. इस्लामाबादमध्ये होणा•या सार्क परिषदेमध्ये भारत सहभागी होणार नाही. सार्कचं प्रमुखपद सध्या नेपाळकडे आहे, नेपाळला भारतानं आपला निर्णय कळवलाय.

पाकिस्तानातून भारतामध्ये वाढलेल्या दहशतवादी कारवाया, तसंच भारताच्या अंतर्गत कारभारात पाकिस्तानचा वाढलेला हस्तक्षेप अशी कारणं भारतानं दिली आहेत. अशा तणावाच्या परिस्थितीमध्ये सार्क परिषद यशस्वी होणं शक्य नाही असं भारताचं म्हणणं आहे. इस्लामाबादमध्ये नोव्हेंबर 2016मध्ये 19 वी सार्क शिखर परिषद होणार आहे.

त्यामध्ये सर्व सदस्य देशांचे राष्ट्रप्रमुख उपस्थित राहणं अपेक्षित आहे. मात्र, उरी दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानला जातील का असा प्रश्न होता. त्याला आता उत्तर मिळालंय. प्रादेशिक सहकार्य, परस्पर संपर्क या धोरणांना भारत बांधिल आहे, मात्र दहशतवाद मुक्त वातावरणात हे शक्य असल्याचं भारतातर्फे स्पष्ट करण्यात आलंय. सार्कमधले आणखीही काही सदस्य देश पाकिस्तानला जाण्यास राजी नसल्याचं भारतानं म्हटलंय. अफगाणिस्तान, बांग्लादेश आणि भूतान हे देशही सार्क परिषदेला न जाण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 27, 2016 11:00 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close