S M L

केंद्रीय सुरक्षा समितीच्या बैठकीसाठी शरद पवार दिल्लीला रवाना

Samruddha Bhambure | Updated On: Sep 29, 2016 01:26 PM IST

sharad pawar 21

29 सप्टेंबर :  पाकिस्तानने आज पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे. उरी हल्ला आणि पाकिस्तानकडून सातत्याने होणाऱ्या कुरघोडीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केंद्रीय सुरक्षा समितीची बैठक बोलावली. या बैठकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पावार यांना देखील तातडीने दिल्लीत बोलवण्यात आलं आहे. त्यामुळे शरद पवार मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक अर्धवट सोडून तातडीने दिल्लीकडे रवाना झाले आहेत.

 या बैठकीसाठी देशातील तीनही सैन्यदलाच्या प्रमुखांच्या उपस्थितीबरोबरच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्यासह अनेक ज्येष्ठ मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित आहेत. या बैठकीत भारत आज पाकिस्तानसोबतचा शस्त्रसंधीचा करार मोडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात 2003 साली शस्त्रसंधी करार झाला होता.

दरम्यान, काल रात्री सीमेवर पुन्हा गोळीबार झाला. त्यात आमचे दोन जवान मारले गेल्याचा दावा पाकिस्ताननं केला आहे. शस्त्रसंधी करार जर संपुष्टात आला, तर सैन्यदलाला तात्काळ निर्णय घेण्याची आणि त्याची अंमलबजावणी करण्याची मुभा मिळेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 29, 2016 01:26 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close