S M L

चुकून LOC ओलांडणारा जवान धुळ्यातला, परत आणण्याचे सर्व प्रयत्न सुरू

Samruddha Bhambure | Updated On: Sep 30, 2016 06:31 PM IST

चुकून LOC ओलांडणारा जवान धुळ्यातला, परत आणण्याचे सर्व प्रयत्न सुरू

 

cHANdu chavan

30 सप्टेंबर : भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांचा खात्मा केला आणि यानंतर सर्वच स्तरातून भारतीय जवानांच कौतुक केलं जात आहे. मात्र, भारताच्या राष्ट्रीय रायफल दलाच्या एका जवानाला पाकिस्ताननं ताब्यात घेतल्याचा दावा पाक लष्करानं केला आहे. त्याला परत आणण्याचे पूर्ण प्रयत्न सुरू आहेत.

भारतीय जवानानं चुकून नियंत्रण रेषा म्हणजेच एलओसी पार केली. त्यामुळं पाकिस्तानच्या लष्करानं भारतीय जवानाला ताब्यात घेतलं आहे. हा जवान महाराष्ट्राचा असून चंदू बाबुलाल चव्हाण असं त्याचं नाव आहे. चंदू चव्हाण हे २३ वर्षांचा असून तो मुळचा धुळे जिल्ह्यातील बोरविहीर इथला आहेत. लष्कराच्या आमर्ड रेजिमेंटमध्ये ते जवान म्हणून कार्यरत आहेत.

आपले डीजीएमओ रणबीर सिंग यांनी पाकिस्तानच्या डीजीएमओशी दोनदा बातचीत केलीय. तो राजस्थान रायफल्सचा आहे, अशी माहिती सूत्रांकडून कळतंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 30, 2016 12:43 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close