S M L

गिफ्टचा नवा पर्याय...आंबा!

प्राची कुलकर्णी, पुणे21 एप्रिलगिफ्टचा विचार करताना सहसा पर्याय निवडला जातो तो उपयोगी वस्तू देण्याचा. पण आता पुण्यात गिफ्टसाठी एक अनोखा पर्याय मिळाला आहे. आंबा! होय. पुण्यातील देसाई बंधू आंबेवाल्यांनी आंबा गिफ्ट व्हाऊचर हा नवा उपक्रम सुरू केला आहे.200 आणि500 रुपयांच्या किंमतीमध्ये हे व्हाऊचर्स उपलब्ध आहेत. जेव्हा आंबे आणायचे असतील तेव्हा हे व्हाउचर्स जमा करायचे. त्या दिवशीच्या भावाप्रमाणे तेवढ्या किमतीचे आंबे तुम्हाला दिले जातील अशी ही संकल्पना आहे. देशातच नाही तर परदेशातही आंबा प्रसिद्ध असल्याने कॉर्पोरेट कंपन्या आणि पीआर एजन्सीज यांच्याकडून या व्हाऊचर्सना चांगला प्रतिसाद मिळत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 21, 2010 01:51 PM IST

गिफ्टचा नवा पर्याय...आंबा!

प्राची कुलकर्णी, पुणे

21 एप्रिल

गिफ्टचा विचार करताना सहसा पर्याय निवडला जातो तो उपयोगी वस्तू देण्याचा. पण आता पुण्यात गिफ्टसाठी एक अनोखा पर्याय मिळाला आहे. आंबा!

होय. पुण्यातील देसाई बंधू आंबेवाल्यांनी आंबा गिफ्ट व्हाऊचर हा नवा उपक्रम सुरू केला आहे.

200 आणि500 रुपयांच्या किंमतीमध्ये हे व्हाऊचर्स उपलब्ध आहेत. जेव्हा आंबे आणायचे असतील तेव्हा हे व्हाउचर्स जमा करायचे. त्या दिवशीच्या भावाप्रमाणे तेवढ्या किमतीचे आंबे तुम्हाला दिले जातील अशी ही संकल्पना आहे.

देशातच नाही तर परदेशातही आंबा प्रसिद्ध असल्याने कॉर्पोरेट कंपन्या आणि पीआर एजन्सीज यांच्याकडून या व्हाऊचर्सना चांगला प्रतिसाद मिळत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 21, 2010 01:51 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close