S M L

जसलोकच्या सीईओंना समज

21 एप्रिलजसलोक हॉस्पिटलचे सीईओ मनेष मसंद यांना सभागृहाच्या अवमान प्रकरणी आज विधानपरिषदेत सभापती शिवाजीराव देशमुख यांनी समज दिली. काही दिवसांपूर्वी जसलोक हॉस्पिटलच्या पाहणी दौर्‍यावर गेलेल्या लोकप्रतिनिधींना मसंद यांनी खरी माहिती न देता उडवाउडवीची उत्तरे दिली होती. त्या विरोधात गेल्या आठवड्यात विधानपरिषदेत हक्कभंग प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. त्यावर सभापतींनी मसंद यांना दोन्ही सभागृहांची माफी मागावी असे आदेश विधानपरिषदेत दिले. त्यानुसार आज मसंद विधानपरिषदेत हजर झाले. त्यांना सभापतींनी यापुढे अशी चूक करू नये, अशी समज दिली.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 21, 2010 02:42 PM IST

जसलोकच्या सीईओंना समज

21 एप्रिल

जसलोक हॉस्पिटलचे सीईओ मनेष मसंद यांना सभागृहाच्या अवमान प्रकरणी आज विधानपरिषदेत सभापती शिवाजीराव देशमुख यांनी समज दिली.

काही दिवसांपूर्वी जसलोक हॉस्पिटलच्या पाहणी दौर्‍यावर गेलेल्या लोकप्रतिनिधींना मसंद यांनी खरी माहिती न देता उडवाउडवीची उत्तरे दिली होती.

त्या विरोधात गेल्या आठवड्यात विधानपरिषदेत हक्कभंग प्रस्ताव दाखल करण्यात आला होता.

त्यावर सभापतींनी मसंद यांना दोन्ही सभागृहांची माफी मागावी असे आदेश विधानपरिषदेत दिले.

त्यानुसार आज मसंद विधानपरिषदेत हजर झाले. त्यांना सभापतींनी यापुढे अशी चूक करू नये, अशी समज दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 21, 2010 02:42 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close